भारतीय अवकाश शास्त्रज्ञांची मोठी कामगिरी, गुरुपेक्षा 13 पट मोठा ग्रह शोधला...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 06:47 PM2023-05-30T18:47:26+5:302023-05-30T18:48:06+5:30

अहमदाबादमधील प्राध्यापक अभिजीत चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखालील टीमने या ग्रहाचा शोध लावला आहे.

indian-scientist-from-physical-research-laboratory-ahmadabad-discoverd-new-planet | भारतीय अवकाश शास्त्रज्ञांची मोठी कामगिरी, गुरुपेक्षा 13 पट मोठा ग्रह शोधला...

भारतीय अवकाश शास्त्रज्ञांची मोठी कामगिरी, गुरुपेक्षा 13 पट मोठा ग्रह शोधला...

googlenewsNext

Alien Planet Discovered: फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (PRL) अहमदाबादचे प्राध्यापक अभिजित चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय टीमने एका नवीन ग्रहाचा शोध लावला आहे. याचा आकार गुरू ग्रहापेक्षा 13 पट मोठा आहे. भारत, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि अमेरिकेतील शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या टीमने या ग्रहाचे वस्तुमान अचूकपणे मोजण्यासाठी माउंट अबू येथील गुरुशिखर वेधशाळेत स्वदेशी PRL Advanced Radial-velocity Abu-Sky Search Spectrograph (PARAS) चा वापर केला. या ग्रहाचे वस्तुमान 14 ग्रॅम/सेमी 3 असल्याचे म्हटले जात आहे.

भारतातील पीआरएल शास्त्रज्ञांनी शोधलेला हा तिसरा एक्सोप्लॅनेट असल्याची माहिती आहे. याचे तपशीलवार वर्णन खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. नवीन शोधलेला ग्रह TOI 4603 किंवा HD 245134 नावाच्या ताऱ्याभोवती फिरतो. नासाने यापूर्वी हा तारा अज्ञात असल्याचे घोषित केले होते. पण आता तो ग्रह असल्याची पुष्टी झाली असून त्याला TOI 4603b किंवा HD 245134b असे नाव देण्यात आले आहे.

हा ग्रह पृथ्वीपासून 731 प्रकाशवर्षे अंतरावर आहे आणि दर 7.24 दिवसांनी त्याच्या ताऱ्याभोवती फिरतो. 1396 अंश सेल्सिअस तापमानासह हा ग्रह खूप उष्ण आहे. हा शोध वेगळा ठरतो कारण, हा ग्रह महाकाय ग्रह आणि कमी वस्तुमान असलेल्या तपकिरी श्रेणीत येतो, असे इस्रोने म्हटले आहे. त्याचे वस्तुमान गुरूच्या 11 ते 16 पट असल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: indian-scientist-from-physical-research-laboratory-ahmadabad-discoverd-new-planet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.