भारतीय रेल्वेचा मेगा प्लान! २६० स्लीपर वंदे भारत ट्रेन बनवणार; रेल्वेमंत्र्यांनी सगळे सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 13:37 IST2026-02-05T13:34:55+5:302026-02-05T13:37:01+5:30

Sleeper Vande Bharat Train: वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रकल्प टप्प्याटप्प्याने विस्तारला जाणार आहे.

indian railways mega plan 260 sleeper vande bharat train to be built railway minister ashwini vaishnaw tells everything in lok sabha | भारतीय रेल्वेचा मेगा प्लान! २६० स्लीपर वंदे भारत ट्रेन बनवणार; रेल्वेमंत्र्यांनी सगळे सांगितले

भारतीय रेल्वेचा मेगा प्लान! २६० स्लीपर वंदे भारत ट्रेन बनवणार; रेल्वेमंत्र्यांनी सगळे सांगितले

Sleeper Vande Bharat Train: चेअर वंदे भारत ट्रेनला प्रवाशांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता भारतीय रेल्वेने वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू केली आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू होऊन अवघे काही दिवस झाले असले, तरी याचा १०० टक्के प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत आता भारतीय रेल्वेने मेगा प्लान आखला असून, याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महत्त्वाची माहिती दिली. 

लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, वंदे भारत स्लीपर ट्रेन लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी स्वदेशी डिझाइन वापरून विकसित करण्यात आला आहे. आताच्या घडीला स्लीपर वंदे भारत ट्रेनचे दोन रेक पूर्ण तयार आहेत. त्यापैकी पहिला रेक कोलकाता ते कामाख्या या दरम्यान प्रवाशांच्या सेवेत आला आहे. तर दुसऱ्या रेकच्या सर्व चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत. भारतीय रेल्वे २६० वंदे भारत स्लीपर ट्रेन बनवण्याची योजना आखत आहे, असेही अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रकल्प हळूहळू विस्तारत आहे

वैष्णव यांनी सांगितले की, वंदे भारत स्लीपर ट्रेनचा प्रकल्प प्रोटोटाइप डेव्हलपमेंट, चाचण्या आणि निर्मिती अशा पद्धतीने भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड आणि इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई यांच्या तंत्रज्ञान भागीदारांसह राबविला जात आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन नियमित प्रवासी सेवेत आणण्याची प्रक्रिया हळूहळू मागणी आणि ऑपरेशनल तयारीच्या आधारावर अंमलात आणली जाणार आहे. एकूण २६० वंदे भारत स्लीपर ट्रेन रेक बांधण्याची योजना आहे. प्रवासाचा चांगला अनुभव वाढवण्यासाठी आणि सुरक्षित आणि आरामदायी प्रवासात नवीन बेंचमार्क स्थापित करण्यासाठी या ट्रेन आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये आणि प्रवाशांच्या सुविधांसह सुसज्ज आहेत. वंदे भारत व्यतिरिक्त, भारतीय रेल्वेच्या उत्पादन युनिट्स नमो भारत, रॅपिड आणि रीजनल मेट्रो रेक्स, कोलकाता मेट्रो रेक्स, अमृत भारत आणि मेनलाइन एलएचबी कोच यासारख्या ट्रेनसेटसह विविध प्रकारचे प्रवासी कोच तयार करत आहेत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, प्रवाशांनी कन्फर्म आणि तत्काळ तिकिटे रद्द केल्यावर रेल्वेला मिळणारे उत्पन्न वेगळे ठेवले जात नाही. दुसऱ्या एका प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, भारतीय रेल्वेने स्थानके आणि ट्रेनची स्वच्छता राखण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली आहे. स्वच्छता राखण्यासाठी प्रवासी दरात कोणतेही शुल्क आकारले जात नाही. प्रवासी डब्यांमधील शौचालयांची स्वच्छता आणखी सुनिश्चित करण्यासाठी रेल्वेने केलेल्या उपाययोजनांबद्दल विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात वैष्णव यांनी ही माहिती दिली.

 

Web Title : भारतीय रेलवे बनाएगा 260 स्लीपर वंदे भारत ट्रेनें

Web Summary : सकारात्मक प्रतिक्रिया पर सवार होकर, भारतीय रेलवे ने 260 वंदे भारत स्लीपर ट्रेनें बनाने की योजना बनाई है। रेल मंत्री अश्विनी वैष्णव ने साझा किया कि दो रेक तैयार हैं, जिनमें से एक पहले से ही कोलकाता और कामाख्या के बीच यात्रियों की सेवा कर रही है, जिससे लंबी दूरी की यात्रा बेहतर हो रही है।

Web Title : Indian Railways to Build 260 Sleeper Vande Bharat Trains

Web Summary : Riding high on positive feedback, Indian Railways plans to manufacture 260 Vande Bharat sleeper trains. Railway Minister Ashwini Vaishnaw shared that two rakes are ready, with one already serving passengers between Kolkata and Kamakhya, enhancing long-distance travel.