शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय रेल्वेची प्रथमच देशाबाहेर पार्सल सेवा; बांगलादेशात पाठविली आंध्र प्रदेशातील वाळलेली मिर्ची

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 07:22 IST

आंध्र प्रदेशातील गुंटूर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर मिरची उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. येथील मिर्ची आंतरराष्ट्रीय बाजारात प्रसिद्ध आहे.

गुंटूर : भारतीय रेल्वेने इतिहासात प्रथमच देशाच्या सीमा ओलांडून मालवाहतूक सेवा दिली आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील रेड्डीपालेम येथील वाळलेली मिर्ची रेल्वेच्या ‘स्पेशल पार्सल ट्रेन’ने बांगलादेशातील बेनापोले येथे पोहोचविली आहे.रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी एक टष्ट्वीट करून याची माहिती दिली. त्यांनी म्हटले की, ‘देशाच्या सीमांच्या पलीकडे : निर्यातीसाठी तयार होताना रेल्वेने पहिल्यांदाच वाळलेली मिर्ची ‘स्पेशल पार्सल ट्रेन’ने बांगलादेशात पाठविली आहे.’आंध्र प्रदेशातील गुंटूर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर मिरची उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. येथील मिर्ची आंतरराष्ट्रीय बाजारात प्रसिद्ध आहे. येथून बांगलादेशात मोठ्या प्रमाणात मिर्ची निर्यात होते. येथील शेतकरी आणि व्यापारी निर्यातीसाठी रस्ते वाहतुकीचा वापर आजपर्यंत करीत होते. त्यांचा वाहतुकीचा प्रतिटन खर्च ७ हजार रुपये होता. तथापि, लॉकडाऊनच्या काळात रस्ते वाहतूक बंद झाल्यामुळे मिर्चीची निर्यातही थांबली. ही बाब जेव्हा रेल्वे अधिकाऱ्यांना समजली तेव्हा ते स्वत:च शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडे गेले. रेल्वेच्या मालवाहतूक सेवेची माहिती त्यांना दिली. तथापि, रेल्वेच्या मालवाहतूक सेवेत एक मोठी अडचण होती. एका खेपेत किमान १,५00 टन माल असेल, तरच मालवाहू रेल्वे बुक करता येते. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना ते गैरसोयीचे होते.यावर मार्ग काढण्यासाठी रेल्वेने छोट्या म्हणजे ५00 टनांपर्यंतच्या खेपा स्वीकारण्यााचे मान्य केले. दक्षिण-मध्य रेल्वेच्या गुंटूर विभागाने त्यासाठी पुढाकार घेऊन बांगलादेशला मिर्ची पाठविण्यासाठी ‘स्पेशल पार्सल एक्स्प्रेस’ची व्यवस्था केली. त्याचा मोठा फायदा शेतकरी व व्यापाºयांना झाला. आपली मिर्ची थेट बांगलादेशात पाठविणे त्यांना शक्य झाले.कोविड-१९ विषाणू साथीमुळे रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. यातून होऊ शकणारी संभाव्य समस्या टाळण्यासाठी रेल्वेने देशातील मालवाहतुकीची धुरा सांभाळली आहे. औषधी, वैद्यकीय उपकरणे, अन्नधान्य इत्यादी आवश्यक वस्तूंची वाहतूक रेल्वेकडून केली जात आहे. छोट्या पार्सल आकारातही रेल्वे वाहतूक करीत असल्यामुळे देशातील व्यावसायिक व सामान्य नागरिकांची मोठी सोय झाली आहे. ई-कॉमर्स संस्था आणि राज्य सरकारे यांच्यासाठीही रेल्वेने पार्सल सेवा तातडीने उपलब्ध करून दिलीआहे.रेल्वे सूत्रांनी सांगितले की, २२ मार्च ते ११ जुलै २0२0 या काळात ४,४३४ पार्सल ट्रेन चालविण्यात आल्या. त्यातील ४,३0४ गाड्या कालबद्ध वेळापत्रकावर आधारित होत्या.१६ पार्सल व्हॅनची स्पेशल ट्रेन- १६ पार्सल व्हॅन असलेली एक स्पेशल पार्सल ट्रेन बांगलादेशातील बेनापोलेला पाठविण्यात आली आहे. यातील प्रत्येक पार्सल व्हॅनमध्ये वाळलेल्या मिर्च्यांची ४६६ पोती आहेत. एका व्हॅनमधील मिर्च्यांचे वजन १९.९ टन आहे. एका स्पेशल पार्सल ट्रेनमधून एकूण ३८४ टन वाळलेली मिर्ची बांगलादेशला पाठविण्यात आली.- यात प्रतिटन वाहतुकीचा खर्च ४,६0८ रुपये आला. रस्ते वाहतुकीच्या तुलनेत हा खर्च खूपच कमी आहे. रस्ते वाहतुकीद्वारे प्रतिटन खर्च सुमारे ७ हजार रुपये होता.

टॅग्स :railwayरेल्वे