प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; सर्व गाड्यांमध्ये CCTV कॅमेरे बसवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 19:43 IST2025-07-13T19:43:11+5:302025-07-13T19:43:27+5:30

Indian Railway: देशभरातील ७४००० डबे अन् १५००० लोकोमोटिव्हचे नूतनीकरण होणार.

Indian Railways big decision for passenger safety; CCTV cameras to be installed in all trains | प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; सर्व गाड्यांमध्ये CCTV कॅमेरे बसवणार

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; सर्व गाड्यांमध्ये CCTV कॅमेरे बसवणार

Indian Railway:रेल्वे ही भारताची जीवनवाहिनी आहे. दररोज कोट्यवधी लोक या रेल्वेने  प्रवास करतात. या प्रवाशांची सुरक्षितता अधिक मजबूत करण्यासाठी भारतीय रेल्वेने सर्व गाड्यांमध्ये CCTV कॅमेरे बसवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत, देशभरातील सुमारे ७४,००० प्रवासी कोच आणि १५,००० लोकोमोटिव्ह इंजिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक कोचमध्ये चार कॅमेरे बसवले जातील, तर प्रत्येक लोकोमोटिव्हमध्ये सहा कॅमेरे बसवण्याची योजना आहे. कोचमधील एंट्री गेट आणि कॉमन एरियामध्ये दोन कॅमेरे बसवले जातील. या हाय-टेक कॅमेऱ्यांची खास गोष्ट म्हणजे, ते कमी प्रकाशातही उच्च दर्जाचे रेकॉर्डिंग करू शकतात आणि जास्त वेगाने स्पष्ट फुटेज देऊ शकतात. यामुळे पाळत ठेवण्याची व्यवस्था आणि सुरक्षिततेत मोठ्या प्रमाणात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

पानिपतमध्ये ट्रेनमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार
काही दिवसांपूर्वीच पानिपतमध्ये एका ट्रेनमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. महिलेने सांगितले की, ती रेल्वे स्टेशनवर बसली होती. या दरम्यान एका माणसाने येऊन दावा केला की, त्याला महिलेच्या पतीने पाठवले आहे. तो आरोपी महिलेला रिकाम्या कोचमध्ये घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आणखी दोन जण आले आणि त्यांनीही महिलेवर बलात्कार केला. यानंतर तिला रेल्वे ट्रॅकवर फेकून आरोपींनी पळ काढला. महिला रेल्वे ट्रॅकवर पडली असता, तिच्या अंगावरुन एक ट्रेन गेली. या अपघातात तिला तिचा एक पायही गमवावा लागला. या घटनेनंतर, आता कोचमध्ये कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्रत्येक स्टेशनवर कॅमेरे बसवले जातील
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सांगितले होते की, भारतीय रेल्वे महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक पावले उचलत आहे. देशाच्या विविध भागांतील रेल्वे स्टेशनवर कॅमेरे बसवण्याचे काम सुरू आहे. दीड वर्षात देशातील प्रत्येक रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. प्रत्येक विभाग, झोन आणि रेल्वे बोर्डात वॉर रूम उभारण्यात आल्या आहेत, जे नियमितपणे रेल्वे स्टेशनचे निरीक्षण करतात.

Web Title: Indian Railways big decision for passenger safety; CCTV cameras to be installed in all trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.