Indian Railway News: भारतात ट्रेन लेट होणे, वेळापत्रकानुसार सेवा नसणे, नियोजित स्टेशनवर पोहोचण्यात लेट होणे सामान्य गोष्ट आहे. परंतु, याचा अनेक प्रवाशांना मोठा फटका बसत असतो. ट्रेनच्या वेळापत्रकानुसार प्रवासी स्वतःच्या योजना आखत असतात. परंतु, ट्रेनला उशीर झाल्याचा मनस्ताप प्रवाशांना होतो. अशीच एक घटना घडली असून, ट्रेन लेट झाल्यामुळे एका विद्यार्थ्याची अत्यंत महत्त्वाची असणारी UGC NEET परीक्षा हुकली. यानंतर सदर विद्यार्थी कोर्टात गेला आणि कोर्टाने या निष्काळजीपणामुळे रेल्वेला लाखोंचा दंड ठोठावला.
ट्रेनला होणारा उशीर एक सामान्य समस्या आहे. या गोष्टीवरून एका विद्यार्थ्याने रेल्वेला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. ट्रेन लेट होण्यावरून कोर्टात जाऊन दावा दाखल केला आणि मोठ्या दंडाची मागणी केली. विद्यार्थ्याचा या प्रकरणात विजय झाला. ही घटना उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात घडली. जिथे एका विद्यार्थ्याची ट्रेन लेट झाल्यामुळे NEET परीक्षा चुकली. संपूर्ण वर्ष, मेहनत वाया गेली. वकिलामार्फत रेल्वेला धडा शिकवण्यासाठी विद्यार्थ्याने कोर्टात दाद मागितली. अनेक वर्षे चाललेल्या या खटल्यानंतर ग्राहक मंचाला विद्यार्थ्याचे आरोप खरे असल्याचे आढळून आले आणि रेल्वेला मोठा दंड ठोठावला.
तब्बल अडीच तास ट्रेन लेट झाली आणि परीक्षा चुकली
कोतवाली पोलिस स्टेशन परिसरातील पिकोरा बक्ष परिसरातील रहिवासी समृद्धी नामक विद्यार्थी NEETची तयारी करत होती. तिचे परीक्षा केंद्र लखनऊमधील जयनारायण पीजी कॉलेज आले होते. परीक्षा देण्यासाठी, विद्यार्थिनीने बस्तीहून इंटरसिटी सुपरफास्ट ट्रेनचे तिकीट बुक केले. ट्रेन सकाळी ११ वाजता लखनऊला पोहोचणार होती. परंतु लेट झाल्यामुळे ट्रेन तब्बल अडीच तास उशिरा पोहोचली. विद्यार्थिनीला दुपारी १२.३० वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचायचे होते. परंतु, ते शक्य झाले नाही आणि तिची परीक्षा चुकली.
ट्रेनला ठोठावला ९ लाख १० हजारांचा दंड
पीडित विद्यार्थिनीने हे प्रकरण ग्राहक आयोगाकडे नेले. जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष/न्यायाधीश अमरजीत वर्मा आणि सदस्य अजय प्रकाश सिंह यांनी रेल्वेला दंड ठोठावला आणि ₹०९ लाख १० हजार भरपाई देण्याचे आदेश दिले. यात असेही म्हटले आहे की, रेल्वेने भरपाई देण्यास उशीर केला तर त्यांना १२ टक्के व्याजासह दंड भरावा लागेल.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत, समृद्धीचे वकील प्रभाकर मिश्रा यांनी स्पष्ट केले की, ती ७ मे २०१८ रोजी NEET परीक्षा देण्यासाठी लखनौला गेली होती. ट्रेनला उशीर झाल्यामुळे समृद्धी परीक्षा देऊ शकली नाही. तिचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया गेले. जिल्हा ग्राहक आयोगाकडे खटला दाखल केला. रेल्वे मंत्रालय, महाव्यवस्थापक आणि स्टेशन अधीक्षकांना नोटीस पाठवण्यात आल्या, परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने ११ सप्टेंबर २०१८ रोजी खटला दाखल करण्यात आला. हा खटला ७ वर्षांहून अधिक काळ चालला. दोन्ही बाजू ऐकल्या आणि रेल्वेने ट्रेनला उशीर झाल्याचे मान्य केले. परंतु, ट्रेनला उशीर का झाला, याचे कारण स्पष्ट केले नाही. रेल्वेला ४५ दिवसांच्या आत ९ लाख १० हजार रुपये देण्याचे निर्देश दिले. जर ही रक्कम निर्धारित वेळेत दिली नाही तर ग्राहकांना संपूर्ण रकमेवर १२ टक्के व्याज द्यावे लागेल, असेही स्पष्ट केले गेले.
Web Summary : A student missed her UGC NEET exam due to a delayed train. She sued the railway, and the court fined them ₹9.1 lakhs for negligence, covering compensation and potential interest.
Web Summary : ट्रेन में देरी के कारण एक छात्रा की यूजीसी नीट परीक्षा छूट गई। उसने रेलवे पर मुकदमा किया, और अदालत ने लापरवाही के लिए ₹9.1 लाख का जुर्माना लगाया, जिसमें मुआवजा और संभावित ब्याज शामिल है।