रेल्वे नियमात मोठा बदल, प्रवाशांना झटका; आता ८ तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास ‘नो रिफंड’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 06:05 IST2026-03-25T06:03:18+5:302026-03-25T06:05:12+5:30
नव्या नियमांनुसार, आता गाडी सुटण्याच्या ८ तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना कोणताही परतावा मिळणार नाही.

रेल्वे नियमात मोठा बदल, प्रवाशांना झटका; आता ८ तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास ‘नो रिफंड’!
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :रेल्वेतिकिटांच्या काळ्याबाजाराला व एजंटगिरीला आळा घालण्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी तिकीट परताव्याच्या (रिफंड) नियमांत बदल करण्याची घोषणा केली. नव्या नियमांनुसार, आता गाडी सुटण्याच्या ८ तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना कोणताही परतावा मिळणार नाही.
रिफंड नवे नियम जुने नियम
पूर्ण रिफंड ७२ तासांपूर्वी ४८ तासांपूर्वी
२५% कपात ७२ ते २४ तास ४८ ते १२ तास
५०% कपात २४ ते ८ तास १२ ते ४ तास
परतावा नाही ८ तासांपूर्वी ४ तासांपूर्वी