ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 18:26 IST2025-10-21T18:25:42+5:302025-10-21T18:26:17+5:30
indian railway jaipuri sanganeri print cover: जयपूर-असरवा (अहमदाबाद) ट्रेनच्या एसी कोचपासून ही सुरुवात झाली.

ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
indian railway jaipuri sanganeri print cover: रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता एक खास 'सरप्राईज' मिळणार आहे. ट्रेनच्या एसी कोचमध्ये प्रवास करणारे प्रवासी अनेकदा ब्लँकेटबद्दल तक्रार करताना दिसतात. कधी ब्लँकेट घाणेरडे असल्याची तक्रार करतात, तर कधी त्यामुळे त्रास होत असल्याचेही सांगतात. आता ही समस्या दूर करण्यासाठी, रेल्वेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता पांढऱ्या ब्लँकेटऐवजी तेथे जयपूरच्या प्रसिद्ध सांगानेरी प्रिंट असलेले कव्हर दिले जाणार आहे. जयपूर-असरवा (अहमदाबाद) ट्रेनच्या एसी कोचपासून ही सुरुवात झाली आहे.
ट्रेन ब्लँकेटवर सांगानेरी प्रिंट कव्हर्स
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते, पूर्वी गाड्यांमध्ये कव्हरशिवाय ब्लँकेट दिले जात होते, ज्यामुळे प्रवाशांना ते स्वच्छ आहेत की नाही याबद्दल काळजी वाटत असे. ही चिंता दूर करण्यासाठी, रेल्वेने ब्लँकेट कव्हर सुरू केले. आता या कव्हरमध्ये जयपूरची सुंदर सांगानेरी प्रिंट असणार आहे, जी चांगली तर दिसतेच पण ब्लँकेट स्वच्छ आणि सुरक्षित देखील ठेवते. हा उपक्रम पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास, हे देशभरातील गाड्यांमध्ये लागू केले जाईल.
🚨 AC coach passengers will now be covered with vibrant Sanganeri print blankets. pic.twitter.com/qwTbWVLAMt
— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) October 17, 2025
दोन गोष्टींचा विचार
माहितीनुसार, ब्लँकेट कव्हर डिझाइन करताना दोन गोष्टी लक्षात ठेवल्या गेल्या आहेत. असे कव्हर तयार करायचे होते जे बराच काळ टिकेल. दुसरे म्हणजे, ते धुणे सोपे असेल आणि प्रिंट फिकट होणार नाही. सांगानेरी प्रिंट अद्वितीय आहे कारण ते टिकाऊ आहे आणि वारंवार धुतल्यानंतरही त्याची चमक टिकवून ठेवते.
रेल्वे स्थानकांवरील नव्या सुविधा
रेल्वेमंत्र्यांनी ६५ रेल्वे स्थानकांवर नवीन सुविधांचे उद्घाटन केले. यामध्ये लहान स्थानकांवर साइनबोर्ड, पूर्ण लांबीचे प्लॅटफॉर्म आणि इतर सुविधांचा समावेश आहे.