शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

5 वर्षात 313 रेल्वे गाड्या रुळावरुन घसरुन अपघात, 419 प्रवाशांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 13:00 IST

भारतीय रेल्वे नागरिकांच्या देशांतर्गत प्रवास करण्याचे मुख्य साधन आहे. भारतीय रेल्वेला कोट्यवधी रुपयांचा महसूल प्राप्त होतो. तरीसुद्धा प्रवाशांची सुरक्षा मात्र रामभरोसेच आहे. कारण भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत नाही.  शेकडो प्रवासी रेल्वे अपघतात मृत्युमुखी पडतात.

ठळक मुद्देगेल्या पाच वर्षांत रेल्वे अपघातात 419 प्रवाशांचा मृत्यूप्रवाशांची सुरक्षा रामभरोसेच

नवी दिल्ली - भारतीय रेल्वे नागरिकांच्या देशांतर्गत प्रवास करण्याचे मुख्य साधन आहे. भारतीय रेल्वेला कोट्यवधी रुपयांचा महसूल प्राप्त होतो. तरीसुद्धा प्रवाशांची सुरक्षा मात्र रामभरोसेच आहे. कारण भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत नाही.  शेकडो प्रवासी रेल्वे अपघतात मृत्युमुखी पडतात. 2013पासून ते 2018पर्यंत एकूण 350 अपघातांमध्ये 419 प्रवाशांच्या नाहक बळी गेला असून 1024 प्रवासी जखमी झाल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे.  

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी रेल्वे अपघातांबाबतची माहिती पुरवण्याची मागणी आरटीआयमार्फत केली होती.  रेल्वे बोर्ड विभागात 2013 पासून ते 2018 पर्यंत एकूण किती रेल्वे अपघात झाले?, अपघातात किती प्रवाशांचा मृत्यू झाला आणि किती जण जखमी झाले? अपघातांमुळे रेल्वेला किती प्रमाणात नुकसान झाला?, ही माहिती शेख यांनी विचारली होती. यानंतर रेल्वे बोर्डाचे  जनमाहिती अधिकारी तथा उप निदेशक/संरक्षा संजोय अब्राहम यांनी  शकील अहमद शेख यांना सर्व माहिती उपलब्ध करुन दिली. 

मिळालेल्या माहितीमध्ये धक्कादायक आकडे समोर आले आहेत. आरटीआयनुसार, एप्रिल 2013 पासून मार्च 2018 पर्यंत एकूण 350 रेल्वे अपघात झाले. यामध्ये 419 प्रवाशांचा बळी गेला असून 1024 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातांमुळे रेल्वेला तब्बल 282 कोटी 78 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अपघातांमध्ये लोकल रूळावर घसरणे, उलटणे तसंच आग लागणे यांसारख्या घटनांचा समावेश आहे.  

2013-2014 एकूण 64 रेल्वे अपघात, 41 प्रवाशांचा मृत्यू,  79 प्रवासी जखमी, 38 कोटी 2 लाख रुपयांचे  नुकसान 

2014-2015 एकूण 74 रेल्वे अपघात, 119 प्रवाशांचा मृत्यू, 322 प्रवासी जखमी, 72 कोटी ८ लाख रुपयांचे नुकसान 

2015-2016 एकूण 68 रेल्वे अपघात, 36 प्रवाशांचा मृत्यू,  101 प्रवासी जखमी, 59 कोटी 24 लाख रुपयांचे नुकसान 

2016-2017एकूण 84 रेल्वे अपघात, 195 प्रवाशांचा मृत्यू,  346 प्रवासी जखमी, 62 कोटी 29 लाख रुपयांचे नुकसान 

2017-2018 एकूण 60 रेल्वे अपघात, 28 प्रवाशांचा मृत्यू, 176 प्रवासी जखमी, 51 कोटी 15 लाख रुपयांचे नुकसान 

90 टक्के अपघात गाड्या रूळावर घसरल्याने झाले आहेत. तसेच 6 टक्के अपघात गाड्यांची टक्कर, तर 4 टक्के अपघात आग लागण्याच्या घटनांमुळे झाले आहेत.  रेल्वे प्रशासन प्रवाशांकडून शुल्क आकारत आहे. मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी उपाय का केले जात नाहीत, आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघातDeathमृत्यू