भारताच्या शत्रूंची आता खैर नाही! नौदलाला मिळणार ६ हेलिकॉप्टर्स; पाणबुड्या शोधून नष्ट करणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 10:01 PM2024-03-01T22:01:14+5:302024-03-01T22:01:46+5:30

ही सहा हेलिकॉप्टर्स 6 मार्च रोजी भारतीय नौदलात सामील होणार आहेत

Indian Navy to introduce mh60r helicopter soon join which will destroy enemy submarines underwater | भारताच्या शत्रूंची आता खैर नाही! नौदलाला मिळणार ६ हेलिकॉप्टर्स; पाणबुड्या शोधून नष्ट करणार!

भारताच्या शत्रूंची आता खैर नाही! नौदलाला मिळणार ६ हेलिकॉप्टर्स; पाणबुड्या शोधून नष्ट करणार!

Special Helicopters in Indian Navy: आगामी काळात भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे. भारतीय नौदल आता समुद्राच्या तळाशी असलेल्या शत्रूच्या पाणबुड्या शोधून नष्ट करू शकणार आहे. कारण नौदलात आता एक विशिष्ट प्रकारचे हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. MH-60R Seahawk या नावाने हे हेलिकॉप्टर ओळखले जाईल. त्याला 'रोमियो हेलिकॉप्टर' असेही म्हणतात. या हेलिकॉप्टरच्या आगमनाने सागरी किनाऱ्यावरील भारताची ताकद आणखी वाढणार आहे. MH-60R हेलिकॉप्टर स्वदेशी विमानवाहू युद्धनौका IAC विक्रांतची ताकद आणखी वाढवण्यासाठी देखील काम करेल. हे हेलिकॉप्टर 6 मार्च रोजी भारतीय नौदलात सामील होणार आहे.

MH-60R हे हेलिकॉप्टर अमेरिकेच्या स्कॉर्स्की एअरक्राफ्ट कंपनीने बनवले आहे. या रोमियो हेलिकॉप्टरचे एकूण पाच प्रकार आहेत. याशिवाय MH-60Rच्या निर्यातीच्या गुणवत्तेनुसार त्यात बदल केले जातात. त्यांचा वापर पाळत ठेवणे, हेरगिरी, व्हीआयपी हालचाली, हल्ला, पाणबुड्या शोधणे आणि त्यांचा नाश करण्यासाठी केला जाऊ शकतो. हे इतर अनेक प्रकारच्या कामांसाठी वापरले जाऊ शकते. रोमियो हेलिकॉप्टरवर डझनभर सेन्सर्स आणि रडार बसवले आहेत. हे सेन्सर शत्रूच्या प्रत्येक हल्ल्याची माहिती देतात. ते उडवण्यासाठी 3 ते 4 क्रू मेंबर्सची आवश्यकता असते. याशिवाय त्यात ५ जण बसू शकतात.

शस्त्रे, उपकरणे आणि सैन्यासह, त्याचे जास्तीत जास्त टेकऑफ वजन 10,433 किलो आहे. त्याची लांबी 64.8 फूट आणि उंची 17.23 फूट आहे. MH 60R मल्टी-रोल हेलिकॉप्टरमध्ये दोन जनरल इलेक्ट्रिक टर्बोशाफ्ट इंजिन आहेत. जे टेकऑफच्या वेळी 1410×2 किलोवॅटची शक्ती निर्माण करते. त्याच्या मुख्य पंख्याचा व्यास 53.8 फूट आहे. हे रोमन हेलिकॉप्टर एकावेळी 830 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते आणि जास्तीत जास्त 12 हजार फूट उंचीवर उड्डाण करू शकते. या हेलिकॉप्टरचा उभ्या वाढीचा वेग 1650 फूट प्रति मिनिट आहे. रोमियो हेलिकॉप्टर कमाल 270 किलोमीटर वेगाने उड्डाण करू शकते. मात्र, गरजेनुसार हेलिकॉप्टरचा वेग ताशी 330 किलोमीटरपर्यंत वाढवता येतो.

Web Title: Indian Navy to introduce mh60r helicopter soon join which will destroy enemy submarines underwater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.