जैश-आयएसआय बैठकीनंतर भारतीय गुप्तचर संस्था अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 03:16 IST2020-08-26T03:16:04+5:302020-08-26T03:16:18+5:30
जैशच्या तालीम-उल-कुराणमदरसा भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यांत लक्ष्य ठरला होता. त्यानंतर अम्मार याने या हल्ल्यांचा सूड घेण्याची शपथ घेतली होती. इस्लामाबादेत जैश-ए-मोहम्मद मरकजची परिषद झाल्यानंतर ही बैठक झाली हे विशेष.

जैश-आयएसआय बैठकीनंतर भारतीय गुप्तचर संस्था अलर्ट
नवी दिल्ली : पाकिस्तानातील दहशतवादी गट जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना अब्दुल रऊफ असघर आणि पाकिस्तानची गुप्तचर संघटना इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सचे (आयएसआय) दोन वरिष्ठ अधिकारी यांच्यात २० आॅगस्ट रोजी बैठक झाल्याचे समजल्यानंतर भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा व्यवस्था अलर्ट झाल्या आहेत.
अब्दुल रऊफ हा जैश-ए-मोहम्मदचा सध्या प्रमुख म्हणून काम बघत असून, तो मसूद अझहर याचा भाऊ आहे. ही बैठक रावळपिंडीत झाली. तिला असघरचा भाऊ मौलाना अम्मारही उपस्थित होता. बालाकोटमधील हवाई हल्ल्यांनंतर अम्मारने जारी केलेल्या आॅडिओमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर कठोर टीका केलेली आहे.
जैशच्या तालीम-उल-कुराणमदरसा भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यांत लक्ष्य ठरला होता. त्यानंतर अम्मार याने या हल्ल्यांचा सूड घेण्याची शपथ घेतली होती. इस्लामाबादेत जैश-ए-मोहम्मद मरकजची परिषद झाल्यानंतर ही बैठक झाली हे विशेष.
इम्रान खानवर टीका
भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानच्या हवाई दलाचे एफ-१६ विमान मिग-२१ बिसन विमानाने पाडले होते. चुकून वर्धमान हे पाकिस्तानात पडल्यानंतर त्यांना भारतात जाऊ दिल्याबद्दल इम्रान खान यांच्यावर या आॅडिओमध्ये टीका केली गेली होती.