शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

2024 पर्यंत रस्ते अपघातांची संख्या होईल अर्धी; नितीन गडकरींचा मोठा दावा, सांगितला सरकारचा प्लॅन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 17:42 IST

दर वर्षी पाच लाख रस्ते अपघातांत जवळपास 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो आणि तीन लाखहू अधिक लोक जखमी होतात. या विषयावर सरकार गांभीर्याने काम करत आहे...

भारतात दरवर्षी 1.5 लाखांहून अधिक लोक रस्ते अपघातात (Road Accidents) आपला जीव गमावतात. यासंदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. तसेच, रस्ते अपघात कमी करण्यासाठी सरकार कंबरकसून काम करत आहे. 2024 च्या अखेरपर्यंत देशातील रस्ते अपघातांची संख्या निम्म्यावर येईल, असा दावा केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमादरम्यान केला.

केंद्रीय मंत्र्यांनी दिली अशी माहिती -  गडकरी म्हणाले, सरकारने महामार्गांवरील ब्‍लॅक स्‍पॉट्स संपवण्यासाठी आता पर्यंत 25 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. इंदूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, दर वर्षी पाच लाख रस्ते अपघातांत जवळपास 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो आणि तीन लाखहू अधिक लोक जखमी होतात. या विषयावर सरकार गांभीर्याने काम करत आहे आणि 2024 च्या अखेरपर्यंत आपघात आणि मृतांची संख्या 50 टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी सरकारने योजना आखली आहे. 

खर्च करण्यात आले 25 हजार कोटी - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, सरकार रस्ते अपघात कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. 2024 पर्यंत रस्ते अपघात निम्म्यावर आणण्यासाठी सरकार महामार्गांवरील  ब्‍लॅक-स्‍पॉट हटविण्याचे काम करत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील 500 मीटरच्या अशा भागाला ब्लॅक-स्पॉट म्हटले जाते, जेथे 3 वर्षांत पाच रस्ते अपघात झालेले असतील, अथवा, याच काळात 10 मृत्यू झालेले असतील. गडकरी म्हणाले, ब्लॅक-स्पॉट हटविण्यासाठी सरकारने आतापर्यंत 25,000 कोटी रुपये खर्च केले आहेत. तसेच, जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेच्या मदतीने सरकार 15,000 कोटी रुपयांच्या इतर प्रकल्पांवर काम करत आहे.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघात