६.५% गतीने धावतेय देशाच्या विकासाची गाडी, वेग मंदावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 07:32 IST2025-05-31T07:32:18+5:302025-05-31T07:32:24+5:30
आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा दर घसरून चार वर्षातील नीचांकी ६.५ टक्क्यांवर आला आहे.

६.५% गतीने धावतेय देशाच्या विकासाची गाडी, वेग मंदावला
नवी दिल्ली: भारत सरकारने शुक्रवारी देशाच्या सकल घरगुती उत्पादनाचे (जीडीपी) आकडे जारी केले. त्यानुसार, देशाच्या विकासाची गाडी ६.५ टक्क्यांच्या वेगाने धावताना दिसत आहे.
उत्पादन क्षेत्राच्या कमकुवत कामगिरीमुळे २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या जानेवारी-मार्च तिमाहीत जीडीपी वृद्धीदर मंदावून ७.४ टक्के राहिला. यासोबतच संपूर्ण आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा दर घसरून चार वर्षातील नीचांकी ६.५ टक्क्यांवर आला आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत जीडीपी वृद्धीदर ६.२ टक्के होता. वार्षिक आधारावर जीडीपी वृद्धी दरात घट झाल्याचे दिसून येते. २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत जीडीपी वृद्धीदर ८.४ टक्के इतका होता. चौथ्या तिमाहीत जीडीपीचे आकडे अंदाजांच्या तुलनेत चांगले राहिले. ६.८५ टक्के दराची अपेक्षा होती.