शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

"घाव बरा झालाय पण...", कॅन्सरशी लढत असलेल्या डॉक्टर पत्नीला 'आधार' देताना सिद्धू भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 15:02 IST

काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू सध्या मानसिक त्रासाचा सामना करत आहे.

अमृतसर : भारताचे माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू सध्या मानसिक त्रासाचा सामना करत आहे. सिद्धू यांची पत्नी डॉ. नवज्योत कौर सिद्धू या कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी लढा देत आहेत. नवज्योतसिंग सिद्धू अलीकडेच रोड रेज प्रकरणातून तुरुंगातून बाहेर आले असून आपल्या पत्नीची काळजी घेत आहेत. पत्नी नवज्योत कौर यांना स्वतःच्या हाताने जेवू घालतानाचे फोटो त्यांनी शेअर केले असून एक भाविनक संदेश देखील लिहला आहे. 

१९ मे २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांना रोड रेज प्रकरणी एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. शिक्षेचा कालावधी पूर्ण होत असतानाच सिद्धू यांना मानसिक त्रासाचा सामना करावा लागत आहे. ते एप्रिलमध्ये तुरुंगात असताना त्यांची पत्नी डॉ. नवज्योत कौर सिद्धू यांना कर्करोगाचे निदान झाले. तेव्हापासून नवज्योत कौर सिद्धू यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

सिद्धू भावुक तुरूंगातून बाहेर आल्यापासून काँग्रेस नेते नवज्योत सिद्धू आपल्या पत्नीसोबत सावलीसारखे उभे आहेत. डॉ.नवज्योत कौर सिद्धू यांच्यावर आतापर्यंत पाच केमोथेरपी उपचार झाले आहेत. दरम्यान, सिद्धूंनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून भावनिक पोस्टसह फोटोही शेअर केले आहेत. फोटोंमध्ये सिद्धू आपल्या पत्नीला स्वत:च्या हाताने जेवण भरवताना दिसत आहे.

सिद्धू यांनी पोस्टमध्ये म्हटले, "घाव बरा झाला आहे पण या परीक्षेच्या मानसिक जखमा अजूनही कायम आहेत. आता ५वी केमो चालू आहे, काही कालावधी तर चांगली नस शोधण्यातच व्यर्थ गेला. पण, नंतर डॉ. रुपिंदरचे कौशल्य कामी आले. डॉक्टरांनी पत्नीला हात हलवायला नकार दिला म्हणून मी स्वतः चमच्याने तिला खाऊ घातले. शेवटच्या केमोनंतरची स्थिती लक्षात घेऊन… कडक उन्हामुळे तिला मनालीला घेऊन जाण्याची वेळ आली आहे." 

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूPunjabपंजाबcongressकाँग्रेस