शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

CoronaVirus: देशाची अर्थव्यवस्था संकोचण्याची भीती; सीआयआयचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 07:01 IST

जर परिस्थिती लवकर सुधारली तर अर्थव्यवस्थेच्या विकासदरामध्ये १.५ टक्क्यांपर्यंतच वाढ होण्याचा अंदाजही व्यक्त केला आहे.

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) उणे ०.९ टक्क्यांपर्यंत खाली येण्याची भीती कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीने (सीआयआय) व्यक्त केला आहे. जर परिस्थिती लवकर सुधारली तर अर्थव्यवस्थेच्या विकासदरामध्ये १.५ टक्क्यांपर्यंतच वाढ होण्याचा अंदाजही व्यक्त केला आहे.कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ मंदावण्याचीच मोठी शक्यता आहे. एकूण देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर ०.६ टक्के राहू शकतो. परंतु जर अर्थव्यवस्थेला चांगली गती मिळाली तर एकूण देशांतर्गत उत्पादनाचा दर १.५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो, मात्र अनेक दशकांमधील हा नीचांक असण्याची स्थिती आहे.कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीने पुढे म्हटले आहे की, लॉकडाउन संपल्यावर आर्थिक व्यवहार सुरू होतील, पण ते सामान्य होण्यास काहीवेळ लागेल. देशातील काही भागांना हॉटस्पॉट घोषित केले आहे. त्याठिकाणी लॉकडाउन संपण्यास वेळ लागेल. अशा परिस्थितीत अर्थव्यवस्थेला सर्वत्र सारखी गती मिळणे कठीण होईल. त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.मदतीचा हात देण्याची गरजअर्थव्यवस्था कठीण काळातून जात आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारने देशातील उद्योगांना विविध सवलती देण्याची गरज असल्याचे सीआयआयने म्हंटले आहे. सरकारने उद्योगांना आर्थिक सवलतींचे पॅकेज तातडीने जाहीर करण्याची गरज आहे. छोट्या आणि मध्यम उद्योगांना अधिक सवलती पुरविणे गरजेचे आहे. या उद्योगांना अधिक खेळते भांडवल सरकारने पुरवावे, असेही सीआयआयने सुचविले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEconomyअर्थव्यवस्था