Lieutenant Governor Manoj Sinha, Uri Sector: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही पाकिस्तानला अक्कल आलेली नाही. जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाककडून सतत गोळीबार सुरु आहे. शुक्रवारी जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी उरी सेक्टरला भेट दिली आणि पाकिस्तानी गोळीबारामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी सुरक्षा दलांशी त्यांनी संवाद साधला. त्यांनी लग्मा आणि गिंगल या सीमावर्ती गावांना भेट दिली आणि बाधित कुटुंबांची भेट घेतली आणि मदत कार्याचा आढावा घेतला. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी परिसरात तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांची भेट घेतली आणि त्यांचे मनोबल वाढवले. सैनिकांशी बोलत असताना त्यांनी विचारले, हाऊज दि जोश? ज्याला उत्तर म्हणून सैनिकांनी मोठ्या आवाज म्हटले, "हाय सर!" हा क्षण एलजी कार्यालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे.
उरीमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा म्हणाले की, भारतीय सशस्त्र दल कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत. जम्मू आणि काश्मीर प्रशासन येथील लोकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची खात्री करत आहे. मी सीमावर्ती भागातील ज्या गावांमध्ये नुकसान झाले आहे तिथे गेलो. जखमी आणि मृतांच्या कुटुंबियांना मदत देण्यात आली आहे. नुकसानीचे मूल्यांकन केले जात आहे. येत्या काळात नवीन बंकरची आवश्यकता असेल, त्यामुळे ते देखील बांधले जातील. सैनिकांच्या डोळ्यात दृढनिश्चय दिसतो. मी संपूर्ण देशाला खात्री देऊ इच्छितो की तुम्ही सुरक्षित हातात आहात. संपूर्ण देश सैनिकांच्या शौर्यापासून प्रेरणा घेत आहे. भगवान श्री राम तुम्हाला शत्रूचा पराभव करण्याची शक्ती देवो. जय हिंद!
बारामुल्लामध्ये देशातील सर्वात धाडसी लोकांमध्ये असणे ही अभिमानाची गोष्ट आहे, असे एलजी यांनी लिहिले. त्यांचे स्वप्न आणि संकल्प एकच आहे - भारतावर हल्ला करण्याच्या शत्रूच्या क्षमता नष्ट करणे आणि देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि नागरिकांचे रक्षण करणे.