ते एफ-16 विमान विंग कमांडर अभिनंदन यांनीच पाडले, हवाई दलाने फेटाळला अमेरिकन मासिकाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 07:38 PM2019-04-05T19:38:56+5:302019-04-05T19:39:37+5:30

 पाकिस्तानच्या ताफ्यात असलेली सगळी एफ-16 विमाने सुरक्षित असल्याचा अमेरिकन मासिकाने केलेला दावा भारतीय हवाई दलाने फेटाळून लावला आहे.

Indian Air Force rejected an American magazine's Claim | ते एफ-16 विमान विंग कमांडर अभिनंदन यांनीच पाडले, हवाई दलाने फेटाळला अमेरिकन मासिकाचा दावा

ते एफ-16 विमान विंग कमांडर अभिनंदन यांनीच पाडले, हवाई दलाने फेटाळला अमेरिकन मासिकाचा दावा

googlenewsNext

नवी दिल्ली -  पाकिस्तानच्या ताफ्यात असलेली सगळी एफ-16 विमाने सुरक्षित असल्याचा अमेरिकन मासिकाने केलेला दावा भारतीय हवाई दलाने फेटाळून लावला आहे. भारताच्या एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने केलेला प्रतिहल्ला परतवून लावत असताना विंग कमांडर अभिनंदन यांनी एफ-16 विमान पाडले होते. तसेच भारतावर हल्ला करण्यासाठी आलेल्या एफ-16 विमानांपैकी एक विमान परत माघारी फिरले नसल्याचे पाकिस्तानी हवाई दलाच्या रेडिओ संभाषणातून उघड झाले आहे, असा दावा हवाई दलाच्या सूत्रांनी केला आहे. 

14 फेब्रुवारी रोजी काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत या हल्ल्याचा बदला घेतला होता. दरम्यान, 27 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानी हवाई दलाने भारताच्या हद्दीत घुसखोरी करून भारताला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क असलेल्या भारतीय हवाई दलाने हा हल्ला हाणून पाडला होता. दरम्यान, यावेळी उडालेल्या हवाई चकमकीत मिग विमान चालवत असलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडले होते. 





मात्र 27 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तानच्या लढाऊ विमानांमध्ये झालेल्या हवाई चकमकीत एक-16 विमान कोसळलेच नसल्याचा तसेच पाकिस्तानच्या ताफ्यातील सगळी एफ - 16 विमाने सुरक्षित असल्याचा दावा एका मासिकाने केल्याने खळबळ उडाली होती. मात्र भारतीय हवाई दलाने हा दावा फेटाळून लावला आहे. ''विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानी हवाई दलाचे एफ-16 विमान पाकव्याप्त काश्मीरच्या 7 ते 8 किमी आत असलेल्या सब्झकोट भागात पाडले होते. तसेच पाकिस्तानी हवाई दलाचे रेडिओ संभाषण आम्ही रेकॉर्ड केले असून, त्या संभाषणामधून भारतावर हल्ला करणाऱ्या  एफ-16 विमानांपैका एक विमान माघारी आले नसल्याचे स्पष्ट होत आहे , असा दावा भारतीय हवाई दलामधील सूत्रांनी केला आहे. 





27 फेब्रुवारी रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी विमाने कोसळली होती. त्यातील एक विमान भारतीय हवाई दलाचे मिग 21- बिसॉन होते. तर अन्य पाकिस्तानी हवाई दलाचे विमान होते. तसेच इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरवरून ते विमान पाकिस्तानी हवाई दलाकडे असलेले एफ-16 होते हे उघड होत आहे.  



 

Web Title: Indian Air Force rejected an American magazine's Claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.