शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

चीनला लोळवणार भारत! एफडीआयचे नियम करणार शिथिल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 1:11 PM

आंतरराष्ट्रीय कंपन्यांना देणार सवलती, एफडीआयचे नियम करणार शिथिल

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जवळपास गेल्या दोन दशकांपासून चीन हे जगाचे निर्मिती केंद्र बनले आहे. जगभरात पाठवल्या जाणाऱ्या अनेक वस्तूंचे उत्पादन चीनमध्ये केले जाते; पण आता स्थिती वेगाने बदलत आहे. कोरोना महामारीनंतर चीनमध्ये अनेक कडक निर्बंध लागू करण्यात आले. त्यामुळे चीनमधून जगाला होत असलेल्या वस्तूंच्या पुरवठ्याला फटका बसला आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात सतत व्यापारी युद्ध सुरू असते. याच स्पर्धेतून चीनने विदेशी कंपन्यांवर अनेक जाचक नियम लागू केले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी चीनवरील अवलंबित्व कमी केले आहे. 

कंपन्या नवा पर्याय शोधत आहेत. या कंपन्यांना भारतासारखे विशाल मार्केट खुणावत आहे. या कंपन्यांना खेचण्यासाठी भारताने मजबूत रणनीती आखली आहे. परदेशी कंपन्यांकडून भारतात दरवर्षाला कमीत कमी १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाईल, या दिशेने पावले उचलण्यास भारताने सुरुवात केली आहे.

‘चायना प्लस वन’ धोरण भारताच्या पथ्यावर  चीनच्या एकूण कार्यपद्धतीमुळे नाराज झालेल्या कंपन्या सध्या इतर चांगल्या बाजाराच्या शोधात आहेत. या कंपन्यांनी सध्या चायना प्लस वन, असे धोरण स्वीकारले आहे. अशा कंपन्यांना आपल्याकडे खेचण्याचे धोरण भारताने अवलंबिले आहे. 

बड्या कंपन्यांनाही सवलतींचा लाभउत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर सवलती देत आहे. आयफोन बनविणारी ॲपल इंक, तसेच दक्षिण कोरियातील सॅमसंगसारखी कंपनी या सवलतींचा लाभ घेत आहेत. उत्पादनाला चालना मिळाली तरी परदेशी गुंतवणूक मात्र वाढलेली नाही.

वस्तूनिर्मितीत भारताला अपार संधीसिंग म्हणाले की, विकसित देशांमधील महागाई, चढे व्याजदर आणि भूराजकीय संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झालेल्या अडचणी यामुळे जोखमीची स्थिती आहे. इलेक्ट्रिक वाहन, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, तसेच दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या निर्मितीची विलक्षण क्षमता भारताकडे आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूक वाढण्यासाठी सरकारकडून नियम आणखी शिथिल केले जाणार आहेत.

वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव राजेश कुमार सिंह म्हणाले की, देशात येत असलेल्या परकीय गुंतवणुकीत सातत्याने वाढ होत आहे. मार्च २०२३ पर्यंत मागील पाच वर्षांत देशात दरवर्षी सरासरी ७० अब्ज डॉलर्सची परदेशी गुंतवणूक करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात  ही गुंतवणूक १०० अब्ज डॉलर्सच्या जवळपास इतकी होऊ शकते. भारत ही जगात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतFDIपरकीय गुंतवणूक