ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 12:45 IST2025-05-20T12:44:48+5:302025-05-20T12:45:21+5:30

India vs Pakistan war, Jyoti Malhotra: पाकिस्तानने ज्योतीचा भारताविरोधात वापर सुरु केला होता. तिला अशाप्रकारे पाकिस्तानच्या बाजुने करण्यात आले की ती येता-जाता पाकिस्तानने कोणतेही वाईट कृत्य केले तरी ती त्याचे समर्थन करू लागली होती.

India vs Pakistan war: Pakistan gave these three tasks to Jyoti Malhotra; This is how the net was being woven against India... | ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...

ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...

देशद्रोही युट्यूबर ज्योती मल्होत्राबाबत धक्कादायक खुलासे होत आहेत. हेरगिरीबरोबरच भारतात तिला तीन कामे करण्यास सांगण्यात आले होते. हरियाणाच नाही तर देशभरात खळबळ उडविलेल्या या प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढण्यात येत आहेत. पाकिस्तानीदहशतवादी कारवायांएवढ्याच ज्योती मल्होत्राला दिलेल्या टास्क या भयानक होत्या. ज्याचे परिणाम हळूहळू दिसू लागणार होते. 

ज्योती ही दिल्लीपासून १७० किमी दूर असलेल्या हरियाणाच्या हिसारची राहणारी होती. ती पाकिस्तानच्या वळचणीला लागली होती. पाकिस्तानने ज्योतीचा भारताविरोधात वापर सुरु केला होता. तिला अशाप्रकारे पाकिस्तानच्या बाजुने करण्यात आले की ती येता-जाता पाकिस्तानने कोणतेही वाईट कृत्य केले तरी ती त्याचे समर्थन करू लागली होती. अशाप्रकारे तिचा एकप्रकारे ब्रेनवॉश करून तिला गुप्तहेर करत तिच्याच देशाविरोधात वापर करण्यास सुरुवात करण्यात आली होती. 

पाकिस्तानने ज्योतीच्या मदतीने उत्तर भारतात मोठे नेटवर्क उभे केले होते. तिच्या चौकशीत एकेक धक्कादायक खुलासे होत आहेत. पाकिस्तानी अधिकारी दानिश, ज्याला भारताने देशातून जाण्यास सांगितले होते त्याच्याशीच ज्योतीचे जवळचे संबंध बनले होते. त्याने तिच्यासाठी वेगवेगळ्या देशांच्या टूर आयोजित केल्या होत्या, तसेच ज्योतीवर तीन कामे सोपविली होती. यामध्ये पहिले काम म्हणजे तीने तिच्या युट्यूब चॅनलवरून पाकिस्तानची एक सकारात्मक इमेज भारतीयांसमोर उभी करावी हे होते आणि ते ती करतही होती. दुसरे काम म्हणजे पाकिस्तानविरोधातील गोष्टींना बदलून सांगणे होते आणि तिसरे सर्वात धोकादायक म्हणजे तिच्या या टीममध्ये तिच्यासारखीच सोशल मीडिया, युट्यूब आदींवर काम करणाऱ्या इन्फ्लुएन्सरची भरती करणे होते. 

अशाप्रकारे पाकिस्तानने ज्योतीच्या माध्यमातून सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या सोशल मीडियावर पाय पसरण्यास सुरुवात केली होती. भारताविरोधात तिने मानसिक युद्ध छेडले होते. तिचे व्हिडीओ पाहून पाकिस्तान एवढाही वाईट नाही, किंवा जसा दाखविला जातो तसा नाही असे भारतीयांच्या मनावर बिंबविण्यात येत होते. दानिश येनकेनप्रकारे ज्योतीवर नियंत्रण मिळवत होता, असे तपास अधिकाऱ्यांशी संबंधीत सुत्रांनी द प्रिंटला सांगितले आहे. 

Web Title: India vs Pakistan war: Pakistan gave these three tasks to Jyoti Malhotra; This is how the net was being woven against India...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.