शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

T20 WC: सीमेवर पाकच्या कुरापती वाढल्या, भारत-पाक सामना रद्द करण्याची मागणी; भाजप मंत्र्याचाही पाठिंबा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 18:30 IST

T20 World Cup 2021, India vs Pakistan Match: जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कुरापतींमुळे गेल्या आठवड्याभरात भारतीय सैन्याचे नऊ जवान शहीद झाले आहेत.

T20 World Cup 2021, India vs Pakistan Match: जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कुरापतींमुळे गेल्या आठवड्याभरात भारतीय सैन्याचे नऊ जवान शहीद झाले आहेत. पाकिस्तानकडून वारंवार भारतीय हद्दीत घुसखोरीच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे सीमेवर अनेकदा चकमकी उडत आहेत. दहशतवाद्यांकडून जम्म-काश्मीरमधील सामान्य नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. 

जम्मू-काश्मीरमध्ये नुकतंच दहशतवाद्यांनी एका पाणीपुरी विक्रेत्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यात पाणीपुरीवाल्याचा मृत्यू झाला होता. बांका येथील रहिवासी असलेल्या या पाणीपुरीवाल्याच्या वडिलांनी आता ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यात होणारा सामना रद्द करण्याची मागणी केली आहे. भारत-पाक सामना रद्द व्हायला हवा. पाकिस्तानसोबत कोणताही संबंध ठेवला जाऊ नये. सरकारनं याबाबत पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच भारत सरकारकडून ५० लाख रुपयांची नुकसान भरपाईची देखील मागणी केली आहे. 

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह काय म्हणाले?केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर मोठं विधान केलं आहे. पाकिस्तानसोबतच्या संबंधांमध्ये काहीच सुधारणा होत नसेल. त्यांच्या कुरापती अशाच सुरू असतील तर भारत-पाक क्रिकेट सामना रद्द करण्याबाबतचा याचा विचार करायला हवा, असं गिरीराज सिंह म्हणाले आहेत. पाकिस्तानच्या दहशतवादाचा मुखवटा संपूर्ण जगासमोर उघड झाला आहे आणि याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील, असंही ते म्हणाले. राजस्थानच्या जोधपूर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याबाबत त्यांना विचारण्यात आलं असता सिंह यांनी दोन्ही देशांमध्ये सध्याचे ताणलेले संबंध लक्षात घेता सामना रद्द करण्याबाबतचा विचार केला गेला पाहिजे, असं म्हणाले. 

पंजाब सरकारच्या मंत्र्यानंही केली मागणीदहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांचे कुटुंबियच नव्हे, तर पंजाब सरकारमधील मंत्री परगट सिंग यांनीही भारत-पाक सामना रद्द करण्याची मागणी केली आहे. भारत-पाक सामना रद्द केला गेला पाहिजे कारण सीमेवरील परिस्थिती सध्या चिंताजनक आहे. दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणावात आणखी वाढ होणार नाही याचा काळजी घेत सामना रद्द करण्याची गरज आहे, असं कॅबिनेट मंत्री परगट सिंग म्हणाले. 

गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सामान्य नागरिकांना लक्ष्य केलं जात असून यात अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातल्यानंतर भारतीय सैन्यानंही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मोठी शोध मोहिम हाती घेतली आहे. दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा केला जात आहे. या मोहिमेत गेल्या आठवड्याभरात ९ भारतीय जवनांना वीरमरण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानबाबत संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. 

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानBCCIबीसीसीआयTeam Indiaभारतीय क्रिकेट संघT20 World Cupट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१