शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

India vs Belgium Tokyo Olympic: भारतीय हॉकी संघाच्या पराभवानंतर पंतप्रधान मोदी ट्रोल, ट्विटरवर 'हा' शब्द ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 2:58 PM

India vs Belgium Tokyo Olympic: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सामना पाहतानाच ट्विट केलं होतं. मी भारत आणि बेल्जियम यांच्यातील हॉकीचा सामना पाहत आहे, मी भारतीय संघाला शुभेच्छा देतो... असे मोदींनी म्हटले होते. मोदींच्या या ट्विटचा संदर्भ देतच त्यांना ट्रोल करण्यात येत आहे

ठळक मुद्देट्विटरवर पनौती हा ट्रेंड सुरू झाला आहे. काँग्रेस नेते पीसी शर्मा यांनी ट्विट करुन लिहिलं आहे की, अचानक ट्विटरवर पनौती का ट्रेंड करत आहे, असं काय झालंय?.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज भारत आणि बेल्जियम यांच्यात हॉकी मेन्स सेमीफायनल सामना रंगला. हृदयाची धड-धड वाढवणाऱ्या या सामन्यात बेल्जियमकडून भारताचा 5-2 या फरकाने पराभव झाला. या सामन्याकडे तमाम भारतीयांचे लक्ष लागले होते. महत्वाचे म्हणजे प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हा सामना पाहिला. मात्र, टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर, ट्विटरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्रोल करण्यात आलं. तसेच, भारताने सामना गमावण्यास पंतप्रधान मोदीच कारणीभूत ठरल्याचं नेटीझन्सनं म्हटलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सामना पाहतानाच ट्विट केलं होतं. मी भारत आणि बेल्जियम यांच्यातील हॉकीचा सामना पाहत आहे, मी भारतीय संघाला शुभेच्छा देतो... असे मोदींनी म्हटले होते. मोदींच्या या ट्विटचा संदर्भ देतच त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. ट्विटरवर पनौती हा ट्रेंड सुरू झाला आहे. काँग्रेस नेते पीसी शर्मा यांनी ट्विट करुन लिहिलं आहे की, अचानक ट्विटरवर पनौती का ट्रेंड करत आहे, असं काय झालंय?. @preetiagr123 या ट्विटर हँडलवरुन लिहिण्यात आलंय की, जहाँ पडे मेरे कदम, खत्म हो गये सारे वहम... असं त्यांनी लिहंल आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी हॉकीचा सामना पाहात होते, संघाचा पराभव झाला, असे ट्विट रणविजय सिंग या पत्रकाराने केलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सामना पाहताना केलेलं ट्विट

या पराभवानंतर आता भारत कांस्य पदकासाठी खेळणार आहे. यासाठी पंतप्रधान मोदी यांनी भारतीय हॉकी संघाचे मनोबल उंचावत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यासंदर्भात ट्विट करत मोदी म्हणाले, "जय आणि पराजय हा जीवनाचा एक भाग आहे. आपल्या पुरुषांच्या हॉकी संघाने #Tokyo2020 मध्ये त्यांची सर्वोत्तम कामगिरी केली आणि हेच महत्त्वाचे आहे. टीमला पुढील सामन्यासाठी आणि त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा. भारताला आपल्या खेळाडूंचा अभिमान आहे."

ऑलिम्पिकमधील या पुरुष हॉकी सेमीफायनलमध्ये भारत आणि बेल्जियम यांच्यात आज काट्याची टक्कर पाहायला मळाली. भारतीय पुरुष हॉकी संघाने बेल्जियमविरुद्ध जबरदस्त सुरुवात करत सुरुवातीच्याच 8 मिनिटांत दोन गोल केले होते आणि पहिल्या सत्रात भारताने 2-1 ने बेल्जियमवर आघाडी घेतली होती. मात्र, तर दुसऱ्या सत्रात बेल्जियमने 12व्या मिनिटाला गोल करत 2-2 ची बरोबर केली. मात्र, यानंतर भारताचा पराभव झाला.

अखेरची 15 मिनिटं... -भारताचा कर्णधार मनप्रीत सिंग याला पहिल्याच मिनिटाला ग्रीन कार्ड मिळाले आणि त्यामुळे भारताला 10 खेळाडूंसहच खेळावे लागले. त्यात पुढच्या मिनिटाला बेल्जियमनं पेनल्टी कॉर्नर मिळवला, त्यांचा पहिला प्रयत्न अमित रोहिदासनं हाणून पाडला. बेल्जियमनं सलग तीन पेनल्टी कॉर्नर मिळवून भारतीय संघावर दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला अन् त्यांना यश मिळाले. हेंड्रीक्सनं तिसऱ्या प्रयत्नात गोल करून बेल्जियमनला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. आघाडी मिळवल्यानंतर बेल्जियमनं चेंडूवर ताबा राखण्यावर भर दिला अन् हा संघ त्यात तरबेज आहे. दबावाखाली गेलेल्या भारतीय खेळाडूंना बेल्जियमच्या आक्रमणपटूंनी चूक करण्यास भाग पाडले. पण, बेल्जियमनला सलग गोन कॉर्नर मिळूनही गोल करता आले नाही. बेल्जियमनं पुन्हा सलग दोन कॉर्नर मिळवले तेही भारतीय बचावपटूंनी रोखले. पण, 53व्या मिनिटाला बेल्जियमला स्ट्रोक्स मिळाला अन् हेंड्रीक्सनं गोल करून आघाडी 4-2 अशी भक्कम केली. आता अखेरच्या 7 मिनिटांत भारताला आव्हान कायम राखण्यासाठी दोन गोल करणे गरजेचे होते अन् ते अशक्य आव्हान भारताला पेलवलं नाही. बेल्जियमनं हा सामना 5-2 असा जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला.

ऑलिम्पिक स्पर्धेत भारत -सुवर्णपदक - 1928, 1932, 1936, 1948, 1952, 1956, 1964, 1980रौप्यपदक - 1960तिसरे स्थान - 1968, 1972

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीHockeyहॉकीTeam Indiaभारतीय क्रिकेट संघTwitterट्विटर