शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
7
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
8
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
9
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
10
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
11
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
12
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
13
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
14
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
15
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
16
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
17
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
18
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
19
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
20
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

सध्याच्या परिस्थितीनुसार निवडणुका झाल्यास भाजपाला बसणार 100हून अधिक जागांवर फटका - सर्वे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 09:22 IST

देशभरात जर आजच्या परिस्थितीत लोकसभा निवडणूक झाली तर भाजपा पूर्णतः बहुमत मिळणार नाही...

नवी दिल्ली -  देशभरात जर आजच्या परिस्थितीत लोकसभा निवडणूक झाली तर भाजपाला पूर्णतः बहुमत मिळणार नाही, असा दावा इंडिया टुडे-कार्वी इनसाइट्सने ‘मूड ऑफ द नेशन’नं केलेल्या सर्वेक्षणाद्वारे करण्यात आला आहे. तर दुसरीकडे सर्वेनुसार आजही पंतप्रधान नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदासाठीचे सर्वाधिक लोकप्रिय उमेदवार आहेत. सर्वेमध्ये सहभागी झालेल्या 49 टक्के लोकांनी नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  तर 27 टक्के लोकांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पसंती दर्शवली आहे.  

सर्वेनुसार, काँग्रेस आणि यूपीएची केवळ मतदान टक्केवारी नाही तर लोकसभा 2014च्या तुलनेत जागाही वाढताना दिसत आहेत. दुसरीकडे, भाजपाच्या जागा कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लोकसभा 2014 च्या निवडणुकीत भाजपाप्रणित एनडीएनं 320 हून अधिक जागा जिंकत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बहुमतातील सरकार स्थापन केले होतं. लोकसभा 2019ची निवडणूक मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. तसंच येत्या काही महिन्यांमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड सारख्या राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. या सर्वेमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भातील तीन शक्यतांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  

1. जर यूपीए आणि एनडीए 2014तील घटकपक्षांसोबतच निवडणूक लढवत असल्यास...जर 2014 प्रमाणे राजकीय परिस्थिती असेल तर एनडीएला 281 जागा, यूपीएला 122 जागा आणि इतरांना 140 जागा मिळू शकतात. मतदान टक्केवारीबाबत बोलायचे झाल्यास एनडीएला 36 टक्के, यूपीएला 31 टक्के आणि इतरांना 33 टक्के मतं मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 2014 मध्ये सपा, बसपा आणि तृणमूल काँग्रेस यूपीएमध्ये सहभागी नव्हते. 2014 मध्ये 23 पक्षांच्या एनडीए युतीला 336 जागा मिळाल्या होत्या. यावेळी एकट्या भाजपाला 282 जागांवर दणदणीत विजय मिळला होता. काँग्रेसला केवळ 44 जागा, तर 12 पक्षांच्या यूपीए आघाडीला 60 जागांवर विजय मिळाला होता. साडेचार वर्षांनंतर यूपीए आघाडीला दुप्पटीने जागा मिळतील, असा अंदाज आहे. तर एनडीएला 55 जागांवर नुकसान होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.  

2. जर यूपीएमध्ये सपा, बसपा आणि तृणमूल सहभागी होत असल्यास... जर काँग्रेसप्रणित यूपीएने सपा, बसपा आणि तृणमूल काँग्रेससोबत हातमिळवणी केल्यास   एनडीएची मतदान टक्केवारी कमी होणार नाही. मात्र जागा कमी होऊन 228 वर येऊ शकते. म्हणजे एनडीएला 100हून अधिक जागांवर नुकसान होऊ शकते. तर  यूपीएच्या जागा वाढून 224 होऊ शकतात. तर इतरांना 91 जागा मिळतील.  दूसरी परिस्थितीत यूपीएला जवळपास 41 टक्के, एनडीएला 36 टक्के आणि अन्य पक्षांना जवळपास 23 टक्के मतं मिळतील. 

3. एनडीएनं दक्षिण भारतात एआयएडीएमके आणि वायएसआर काँग्रेससोबत युती केल्यास...सर्वेनुसार, जर एनडीएने तामिळनाडूमधील सत्ताधारी पक्ष अण्णाद्रमूक आणि आंध्र प्रदेशातील विरोधी पक्ष वायएसआर काँग्रेससोबत हातमिळवणी केली आणि काँग्रेसने टीडीपी आणि जम्मू काश्मीरमधील पीडीपीला सोबत घेतले. तर एनडीएच्या जागांचा आकडा 255 पर्यंत पोहोचू शकतो. अशा परिस्थितीत यूपीएला 242 जागा मिळून त्यांना 43 टक्के मतं मिळू शकतात. इतरांना 46 जागा मिळू शकतात. जर टीआरएस आणि बीजेडी बीजेपीसोबत निवडणुकीनंतर एकत्र येत असल्यास एनडीएच्या एकूण 282 जागा होतील.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस