India-Russia Relation: भारताचा मित्रराष्ट्र रशियानेपाकिस्तानला लढाऊ विमानाचे इंजिन पुरवल्या दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर रशियाशी संबंध बिघडवल्याचा आरोप केला. मात्र, भाजपचे प्रवक्ते अमित मालवीय यांनी हे दावे खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचे म्हणत फेटाळून लावले.
मोदी सरकारचे अपयश...
रशियाने पाकिस्तानला JF-17 थंडर ब्लॉक III फायटर जेटसाठी RD-93MA इंजिन पुरवल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. यावरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप–प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत म्हटले की, “मोदी सरकारने देशाला हे स्पष्ट केले पाहिजे की, जो रशिया एकेकाळी भारताचा सर्वात विश्वासू रणनीतिक भागीदार होता, तो आता पाकिस्तानला लढाऊ विमानांचे इंजिन पुरवतोय. हे मोदी सरकारचे अपयश आहे.”
S-400 आणि Su-57 करारांवरही प्रश्नचिन्ह
“ही इंजिने चिनी बनावटीच्या JF-17 लढाऊ विमानांच्या ताफ्यासाठी वापरली जाणार आहेत. या विमानाचा नव्या पिढीचा ब्लॉक III व्हेरियंट, या सुधारित इंजिनासह तसेच PL-15 क्षेपणास्त्रांसह सज्ज असेल. ही तीच क्षेपणास्त्रे आहेत, ज्यांचा वापर ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताविरुद्ध झाल्याचे मानले जाते. रशियासोबत S-400 क्षेपणास्त्र प्रणाली आणि Su-57 स्टेल्थ फायटरवर चर्चा चालू असताना, त्याच रशियाकडून पाकिस्तानला इंजिन पुरवठा होणे, हे सरकारच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश दर्शवते,” अशी टीका जयराम रमेवेश यांनी एक्सवरुन केली.
खोट्या बातम्यांवर आधारित आरोप...
भाजपचे प्रवक्ते अमित मालवीय यांनी काँग्रेसच्या आरोपांना फेटाळून लावले आणि म्हणाले की, “काँग्रेस खोटी माहिती पसरवते आहे. रशियाने अशा सर्व दाव्यांना स्पष्टपणे नकार दिला आहे. जयराम रमेश यांनी ज्या बातमीचा उल्लेख केला, ती एका अप्रसिद्ध वेबसाइटवरून आली आहे. ही प्रो-पाकिस्तान प्रोपगंडा पसरवण्यासाठी ओळखली जाते. कोणताही अधिकृत स्रोत नाही, कोणतीही विश्वसनीय पुष्टी नाही, फक्त एक खोटी अफवा. काँग्रेस वारंवार अशा खोट्या बातम्यांच्या माध्यमातून राष्ट्रहिताऐवजी विरोधकांच्या बाजूने उभी राहते,” असा पलटवार मालवीय यांनी केला.
रशियाची अधिकृत भूमिका अजून स्पष्ट नाही
आत्तापर्यंत रशियाच्या कोणत्याही अधिकृत संस्थेने पाकिस्तानला फायटर जेट इंजिन पुरवठ्याची पुष्टी केलेली नाही. मात्र या अफवेने भारताच्या परराष्ट्र धोरण, रशियासोबतचे संरक्षण-संबंध, आणि दक्षिण आशियातील सामरिक संतुलन या विषयांवर नवी चर्चा सुरू झाली आहे.
Web Summary : Congress alleges Russia supplied fighter jet engines to Pakistan, criticizing Modi's government. BJP denies the claim, calling it misinformation. The controversy raises questions about India-Russia relations and regional security, though Russia hasn't confirmed the supply.
Web Summary : कांग्रेस ने रूस पर पाकिस्तान को लड़ाकू जेट इंजन की आपूर्ति का आरोप लगाया, मोदी सरकार की आलोचना की। बीजेपी ने इसे गलत सूचना बताते हुए खारिज किया। विवाद भारत-रूस संबंधों और क्षेत्रीय सुरक्षा पर सवाल उठाता है, हालांकि रूस ने आपूर्ति की पुष्टि नहीं की है।