शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅक्सी - रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कल्याणकारी मंडळ, विमा, मुलांना नोकरी...
2
अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती महागाई रोखण्यात अडथळा; RBI गव्हर्नरांचे महत्वाचे वक्तव्य
3
अभिषेक बच्चनला बंपर लॉटरी लागली; खटाखट खटाखट १५ कोटींचे सहा आलिशान फ्लॅट खरेदी केले
4
मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर
5
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आक्रमक ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला
6
Reliance Jio : जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप
7
शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले
8
सन्मान निधीनंतर आता कोट्यवधी शेतकऱ्यांना NDA सरकार देणार आणखी एक गिफ्ट?
9
'अ‍ॅनिमल पार्क'संदर्भात रणबीर कपूरच्या सहकलाकाराने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "सिनेमाची कथा..."
10
पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा
11
लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते? कोणते अधिकार मिळतात? जाणून घ्या...
12
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
13
वयाच्या चाळीशीतही अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा; साऊथ नंतर आता बॉलिवूडमध्येही बोलबाला
14
मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
15
वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार
16
खळबळजनक! T20 World Cup मध्ये मॅच फिक्सिंगचा प्रयत्न, वेगवेगळ्या नंबरवरून आले फोन
17
ना आलिया भट, ना ऐश्वर्या अन् नाही कतरिना, ही आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री
18
फडणवीसांशिवाय मंत्रिमंडळात भाजप असणे अशक्य; राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे खळबळजनक वक्तव्य
19
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे लोकार्पण कधी? उद्धव ठाकरेंनी केली बांधकामाची पाहणी
20
सुख-शांती हिरावून घेऊ शकतं स्मार्टफोनचं व्यसन; 'या' आजारांचा धोका, काय आहे Nomophobia?

Coronavirus: दिलासादायक! देशाचा रिकव्हरी रेट ९७.३७ टक्के; ४० हजार ०१७ रुग्ण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2021 10:07 AM

Coronavirus: गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ३८ हजार ६२८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देगेल्या २४ तासांत देशभरात एकूण ३८ हजार ६२८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंदगेल्या २४ तासांत देशभरात ४० हजार ०१७ रुग्ण कोरोनामुक्तआतापर्यंत एकूण ५० कोटी १० लाख ०९ हजार ६०९ नागरिकांचे लसीकरण

नवी दिल्ली: देशवासीयांसाठी काहीसे दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ४० हजार ०१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, गेल्या २४ तासांत देशभरात एकूण ३८ हजार ६२८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (india reports 38 628 new corona cases and 617 deaths in last 24 hours) 

कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणाऱ्यांची संख्या ५० कोटींवर; पंतप्रधान म्हणाले, "मला आशा आहे की..."

केंद्रीय मंत्रालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात ३८ हजार ६२८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत ६१७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे देशात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ४ लाख २७ हजार ३७१ झाली आहे. तर, गेल्या २४ तासांत ४० हजार ०१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९७.३७ टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत एकूण ०३ कोटी १० लाख ५५ हजार ८६१ रुग्ण बरे झाले आहेत. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण ४ लाख १२ हजार १५३ इतकी आहे. आतापर्यंत एकूण ५० कोटी १० लाख ०९ हजार ६०९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 

महाराष्ट्रात दिलासादायक स्थिती

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात ५ हजार ५३९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून, ५ हजार ८५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, १८७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. राज्यात एकूण ६१ लाख ३० हजार १३७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६६ टक्के एवढे झाले आहे. तर, मृत्यूदर २.०१ टक्के एवढा आहे. 

अरे देवा! Vi मुळे ‘या’ तीन बँकांची चिंता वाढली; कंपनी बुडल्यास बसणार मोठा फटका

दरम्यान, मुंबईत गेल्या २४ तासात ३०९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे ४०७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबईत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ७ लाख १४ हजार १६६ इतकी झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के आहे. मुंबईत ४ हजार ३४५ रुग्ण सक्रिय असून, रुग्णदुपटीचा कालावधी १ हजार ६३१ दिवसांवर पोहोचला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार