स्क्रीनवर वेळ वाया घालवण्यात भारत जगात तिसऱ्या स्थानी, अमूल्य वेळ वाया घालवावा की, योग्य ठिकाणी गुंतवावा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 10:58 IST2025-03-31T10:58:00+5:302025-03-31T10:58:52+5:30
Screen Time Wasting: भारतात अंदाजे १२० कोटी सस्मार्टफोन युजर्स आहेत तर ९५ कोटी इंटरनेट युजर्स आहेत. युजर्सना इंटरनेटसाठी प्रति गिगाबाइट (जीबी) केवळ १० रुपये इतका कमी खर्च येतो.

स्क्रीनवर वेळ वाया घालवण्यात भारत जगात तिसऱ्या स्थानी, अमूल्य वेळ वाया घालवावा की, योग्य ठिकाणी गुंतवावा?
भारतात अंदाजे १२० कोटी सस्मार्टफोन युजर्स आहेत तर ९५ कोटी इंटरनेट युजर्स आहेत. युजर्सना इंटरनेटसाठी प्रति गिगाबाइट (जीबी) केवळ १० रुपये इतका कमी खर्च येतो.
स्वस्तातील स्मार्टफोनची उपलब्धता आणि कमी खर्चात इंटरनेट यामुळे देशात डिजिटलायझेशन वेगाने वाढत असले तरी यामुळे भारतीय नागरिक विशेषतः तरुण स्मार्टफोनच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे.
जागतिक व्यवस्थापन सल्लागार कंपनी इव्हाय अर्थात अन्र्स्ट अँड यंग यांच्या ताज्या अहवालानुसार, भारतीय युजर्स दररोज सरासरी ५ तास सोशल मीडिया, गेमिंग आणि टिटिसो स्टिमिंगतर खर्च करीत आहेत. परवडणारे इंटरनेट आणि स्वस्तातील फोन यामुळे हे शक्य झाले असले तरी यात तरुणांचा अत्यंत महत्त्वाचा वेळ वाया जात आहे. हा वेळ तरुणांनी गुंतवणुकीच्या विविध पर्यायाचा अभ्यास करण्यात खर्च केला तर यातून कमाई वाढून जगणे त्यांचे जगणे अधिक समृद्ध होऊ शकले असते.
स्क्रीनवर वेळ वाया घालवण्यात भारत जगात तिसऱ्या स्थानी १.१ लाख कोटी तास
देशातील युजर्सनी एकत्रितपणे २०२४ मध्ये स्क्रीनवर खर्च केले आहेत. भारतात दररोज मोबाइल स्क्रीनवर खर्च होणाऱ्या वेळेच्या बाबतीत इंडोनेशिया आणि ब्राझीलनंतर तिसऱ्या स्थानी आहे.
५ तासांतील ७०% वेळ
भारतीय नागरिक दररोज सोशल मीडिया, व्हिडीओ स्ट्रिमिंग आणि गेमिंगवर खर्च करीत आहेत. यामुळे भारत ही जगातील सर्वांत मोठी डिजिटल बाजारपेठ बनली आहे.
हा वेळ कुठे वापरू शकता?
रिल्स तास-तास बघत बसण्यापेक्षा आर्थिक शिक्षण देणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत, त्यावरून नव्या स्किल्स शिकून घ्या.
गुंतवणुकीचे नियोजन करून त्या दृष्टीने पावले टाकण्यासाठी आपला वेळ खर्ची घाला. डिजिटल बाजारपेठेचे ग्राहक बनण्यापेक्षा त्यावरील क्रिएटर्स बनून पैसा कमवा आणि तो पैसा विविध ठिकाणी गुंतवून स्वतःला समृद्ध करा.