शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
2
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
3
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
4
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
5
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
6
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
7
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
8
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
9
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
10
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
11
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
12
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
13
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
14
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
15
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
16
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
17
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
18
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
19
कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का बसणार, सनसनाटी विजय मिळवणारा नेता शिंदेसेनेच्या वाटेवर
20
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

सीएएवर मलेशियाच्या पंतप्रधानांची आगपाखड, भारत असा शिकवणार धडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 07:51 IST

पहिल्यांदा काश्मीर आणि आता नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी भारताविरोधात गरळ ओकत आहेत.

ठळक मुद्देनागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी भारताविरोधात गरळ ओकत आहेत. भारतानंही आता मलेशियाला धडा शिकवण्यासाठी पाम ऑइलच्या आयातीवर प्रतिबंध घातला होताकेंद्र सरकार मलेशियातून आयात होणाऱ्या मायक्रो प्रोसेसर्सही बॅन करण्याच्या तयारीत आहे.

नवी दिल्लीः पहिल्यांदा काश्मीर आणि आता नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी भारताविरोधात गरळ ओकत आहेत. भारतानंही आता मलेशियाला धडा शिकवण्यासाठी पाम ऑइलच्या आयातीवर प्रतिबंध घातला होता, आता तोच बंदीचा काळ आणखी वाढवण्याचं भारतानं ठरवलं आहे. केंद्र सरकार मलेशियातून आयात होणाऱ्या मायक्रो प्रोसेसर्सही बॅन करण्याच्या तयारीत आहे. काश्मीर आणि नागरिकत्व सुधारणा कायद्यांसारख्या अंतर्गत प्रश्नात मलेशियाच्या पंतप्रधानांना ढवळाढवळ करण्याचा कोणताही अधिकार नाही. दुसरीकडे महातीर मोहम्मद यांनीही भारताच्या अंतर्गत विषयासंदर्भात बोलतच राहणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मलेशियाहून आयात होणाऱ्या मायक्रो प्रोसेसर्स चिपवर भारतात तांत्रिक कारणास्तव बंदी घातली जाऊ शकते.  या चिपचा उपयोग दूरसंचार साधने तयार करण्यासाठी होतो. ''कुठे काही चुकीचं होत असल्यास बोलावं लागेल''भारतानं आमच्या आयातीवर घातलेल्या प्रतिबंधावर मी चिंतीत आहे. परंतु चुकीच्या गोष्टींसंदर्भात मी कायमच बोलत राहणार आहे. भारतानं आमच्या पाम ऑइलवर बंदी घातली आहे, त्यामुळेच आम्ही चिंतीत आहोत, कारण भारत आमचा बाजारातील मोठा ग्राहक आहे, परंतु आपल्याला या गोष्टींवर नजर ठेवावी लागणार आहे, असंही मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच भारतानं आमच्या तेल आयातीवर बंदी घातल्यानं मलेशिया बाजारातही याचे परिणाम पाहायला मिळत आहेत. जाकीर नाईकसंबंधी मलेशियाच्या भूमिकेवर भारत नाराजनागरिकत्व कायदा आणि काश्मीरच्या मुद्द्यांवर महातीर यांनी केलेल्या वक्तव्याशिवाय जाकीर नाईकच्या प्रत्यार्पणावरून मलेशियाच्या भूमिकेवरही भारत नाराज आहे. भारताचा मलेशियाबरोबर 17 अब्ज डॉलरचा व्यापार संबंध आहे. यात 6.4 अब्ज डॉलरची निर्यात आणि 10.8 अब्ज डॉलरच्या आयातीचा समावेश आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी