अमेरिकेच्या नेतृत्वाखालील ‘Pax Silica’ मध्ये भारत सामील; का महत्त्वाचे आहे? काय मिळणार? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 13:11 IST2026-02-20T13:10:29+5:302026-02-20T13:11:14+5:30
India Pax Silica: नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या भारत AI शिखर परिषदेदरम्यान या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.

अमेरिकेच्या नेतृत्वाखालील ‘Pax Silica’ मध्ये भारत सामील; का महत्त्वाचे आहे? काय मिळणार? जाणून घ्या...
India Pax Silica:भारताने शुक्रवारी(२० फेब्रुवारी २०२६) एक महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेत अमेरिकेच्या नेतृत्वाखालील ‘Pax Silica’ या आंतरराष्ट्रीय रणनीतिक आघाडीत औपचारिक सहभाग नोंदवला. नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या भारत AI शिखर परिषदेदरम्यान या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. या वेळी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, अमेरिकेचे आर्थिक व्यवहारांसाठीचे अवर सचिव जेकब हेलबर्ग आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी Pax Silica घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या केल्या.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
AI आणि सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताला मोठा लाभ
Pax Silica मध्ये भारताचा सहभाग केवळ AI आणि सेमीकंडक्टर क्षेत्रात रणनीतिक लाभ देणारा नाही, तर जागतिक तंत्रज्ञान पुरवठा साखळी अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि समावेशक बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. हा निर्णय ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला बळ देणारा ठरणार आहे.
#WATCH | Delhi: At the signing ceremony of the Pax Silica Declaration between India and the US, Ashwini Vaishnaw, Union Minister for Electronics & Information Technology, says, "If this spirit had persisted since 1947, we can all imagine how much compounding would have occurred… pic.twitter.com/95wDV23eBx
— ANI (@ANI) February 20, 2026
Pax Silica म्हणजे काय?
Pax Silica ही अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाची प्रमुख पुढाकार योजना असून, तिची सुरुवात डिसेंबर 2025 मध्ये झाली. या आघाडीचा मुख्य उद्देश आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), सेमीकंडक्टर, क्रिटिकल मिनरल्स (लिथियम, कोबाल्ट इ.) आणि संबंधित जागतिक सप्लाई चेन सुरक्षित, लवचिक आणि नवोन्मेषक्षम बनवणे हा आहे. ही योजना एका देशावर जबरदस्तीने निर्माण होणाऱ्या अवलंबित्वाला कमी करून विश्वसनीय भागीदार देशांमधील आर्थिक-तांत्रिक सहकार्य वाढवण्यावर भर देते.
#WATCH | Delhi: At the signing ceremony of the Pax Silica Declaration between India and the US, US Ambassador to India, Sergio Gor, says, "India's entry into Pax Silica is not just symbolic. It is strategic and essential. India is a nation with deep talent, deep enough to rival… pic.twitter.com/Ea9glHBq8V
— ANI (@ANI) February 20, 2026
या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अवर सचिव जेकब हेलबर्ग म्हणाले, Pax Silica कोणत्याही एका देशाविरोधात नाही, तर जागतिक सप्लाई चेन अधिक मजबूत करण्यासाठी आहे. हे 21व्या शतकातील आर्थिक आणि तांत्रिक व्यवस्थेची दिशा ठरवणारे गठबंधन आहे. भारताचा सहभाग हा 21व्या शतकातील आर्थिक आणि तांत्रिक व्यवस्था घडवणाऱ्या आघाडीत अत्यंत महत्त्वाचा आहे.
भारतासाठी या आघाडीचे महत्त्व
या आघाडीत भारताचा सहभाग म्हणजे भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारीला नवी उंची मिळणे होय. अलीकडील व्यापार करारांनंतर हा निर्णय द्विपक्षीय संबंधांतील सकारात्मक रीसेट मानला जात आहे.
भारताला होणारे प्रमुख फायदे
क्रिटिकल मिनरल्सच्या सुरक्षित पुरवठा व प्रोसेसिंगमध्ये सहकार्य
सेमीकंडक्टर उत्पादन आणि AI इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सक्रिय सहभाग
AI मॉडेल्स, फाउंडेशन मॉडेल्स आणि कम्प्युटिंग क्षमतेसाठी मदत
तांत्रिक आत्मनिर्भरतेला चालना
जागतिक AI-आधारित अर्थव्यवस्थेत भारताची मजबूत भूमिका
‘विश्वसनीय भागीदारां’कडून गुंतवणूक आणि इनोव्हेशनला प्रोत्साहन
चीनवरील अवलंबित्व कमी करण्याची रणनीती?
अधिकृतपणे चीनचा उल्लेख टाळण्यात आला असला, तरी तज्ज्ञांच्या मते जागतिक सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स सप्लाई चेनमधील चीनवरील अवलंबित्व कमी करणे हा या गठबंधनाचा अप्रत्यक्ष उद्देश आहे.
ना अमेरिका, ना रशिया-चीनची घेतली बाजू; गाझा 'बोर्ड ऑफ पीस'बाबत भारताची वेगळी भूमिका...
Pax Silica अंतर्गत विश्वसनीय देशांचे नेटवर्क उभारून, महत्त्वाच्या तांत्रिक संसाधनांसाठी कोणत्याही एका देशावर अवलंबून राहण्याची गरज कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे पाऊल अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक धोरणाचा भाग मानली जाते.
आघाडीतील प्रमुख देश
या अमेरिकाप्रणीत गठबंधनात आधीपासूनच जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, इस्रायल, ब्रिटन, कतार आणि संयुक्त अरब अमिरात यांचा समावेश होता. भारत सामील झाल्याने ही आघाडी अधिक मजबूत झाली असून, भारताची ओळख उदीमशील डिजिटल अर्थव्यवस्था आणि जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून अधिक ठळक होण्याची शक्यता आहे.
भारताच्या सेमीकंडक्टर मिशनसाठी नवे दालन
भारताच्या सेमीकंडक्टर मिशन आणि AI क्षेत्रासाठी हा सहभाग मोठी संधी मानली जात आहे. या आघाडीमुळे तांत्रिक सहकार्य, परदेशी गुंतवणूक, संशोधन भागीदारी आणि जागतिक मागणीशी जोडलेली सप्लाई चेन यामध्ये भारताला नवे मार्ग खुले होतील. यामुळे देशातील चिप उत्पादन, डिझाइन आणि AI-आधारित स्टार्टअप इकोसिस्टम अधिक बळकट होण्याची शक्यता आहे.