India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 22:55 IST2025-05-08T22:54:02+5:302025-05-08T22:55:56+5:30

India pakistan war update: भारताने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानने गुरूवारी रात्री ९ वाजता अचानक हल्ला केला. या हल्ल्यानंतर सीमावर्ती राज्यांमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले आहे. 

India Pakistan War: Pakistan's cunning plan, attacked after dark; What happened, watch the video | India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ

India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ

India Pakistan War Latest Update: भारताने पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना दिलेल्या उत्तराने पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तानने गुरुवारी रात्री ९ वाजता अचानक जम्मू आणि जैसलमेरमध्ये ड्रोन आणि मिसाईल डागल्या. मात्र, भारतीय लष्कराने सर्व मिसाईल आणि ड्रोन आकाशातच निष्क्रिय केले. 

पाकिस्तानने अचानक जम्मू आणि राजस्थानातील काही ठिकाणांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानकडून अचानक ड्रोन, मिसाईल डागल्या. मात्र, भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने हे ड्रोन, मिसाईल हवेत निष्क्रिय केले. 
 
पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर काय काय घडलंय, पहा व्हिडीओ 

पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर धर्मशाला येथे सुरू असलेली आयपीएल मॅच रद्द करण्यात आली. तातडीने स्टेडियम रिकामे करण्यात आले. त्याचेही व्हिडीओ समोर आले आहेत. 

भारताने पाकिस्तानचे १०० ड्रोन पाडले

पाकिस्तानने भारतीय लष्करांच्या तळांना लक्ष्य केले. त्याचबरोबर काही रहिवाशी भागांनाही पाकिस्तानी लष्कराकडून लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला. पण, भारताच्या मिसाईड आणि ड्रोन प्रतिबंधात्मक सिस्टिमने ते सगळे पाडले. ताज्या माहितीनुसार भारताने पाकिस्तानचे १०० पेक्षा अधिक स्फोटक ड्रोन पाडले आहेत. 

Web Title: India Pakistan War: Pakistan's cunning plan, attacked after dark; What happened, watch the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.