India Pakistan War ( Marathi News ) : गुरुवारी संध्याकाळी जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्ह्यांमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने विनाकारण गोळीबार केला. याला भारतीय सशस्त्र दलांनी प्रत्युत्तर दिले. बारामुल्ला येथील बोनियार सेक्टर आणि कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टरला पाकिस्तानने लक्ष्य केले होते, परंतु अद्यापपर्यंत कोणतीयाही जीवितहानीचे वृत्त नाही.
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
७ आणि ८ मे च्या मध्यंतरी रात्री, पाकिस्तानी सैन्याने जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी आणि अखनूर सेक्टरच्या समोरील भागात नियंत्रण रेषेवर लहान शस्त्रे आणि तोफांमधून जोरदार गोळीबार केला. भारतीय सैन्यानेही याला प्रत्युत्तर दिले.
'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी पायाभूत सुविधांवर भारतीय सशस्त्र दलांनी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने बुधवारी गोळीबार सुरू केल्यानंतर कर्नह भागातील बहुतेक नागरिक सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाले होते.
नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
पाकिस्तानकडून क्षेपणास्त्र हल्ल्याचे संकेत मिळताच भारताने ए-४०० प्रणाली सक्रिय केली असून, पाकिस्तानने जम्मू आणि सांबाच्या दिशेने डागलेली क्षेपणास्त्रे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. आतापर्यंत पाकिस्तानची आठ क्षेपणास्त्रे पाडण्यात आल्याचं प्राथमिक वृत्त आहे. त्याशिवाय सांबा आणि अखनूर क्षेत्रात नियंत्रण रेषेपलीकडून पाकिस्तानने भीषण गोळीबार सुरू केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आरएसपुरा विभागात ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. तसेच जम्मू शहरामध्ये मोबाईल नेटवर्क जॅम झाले आहेत. हल्ल्याचे सायरन वाजत आहेत. तसेच सतवारी कॅम्पवरही हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे.