India Pakistan War ( Marathi News ) : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. आज रात्रीपासून पाकिस्तानने पुन्हा हल्ला सुरू केला. या हल्ल्याला भारतानेही प्रत्युत्तर दिले. दरम्यान, आता भारतीय हवाई दलानंतर आता नौदलही सक्रिय झाले आहे. अरबी समुद्रात तैनात असलेल्या आयएनएस विक्रांतने कराचीला लक्ष्य केले आहे. नौदलाच्या हल्ल्यामुळे कराची बंदरासह शहरात मोठी आग लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या कराची आणि ओरमारा बंदरांवर आयएनएस विक्रांतवरून अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. त्यामुळे दोन्ही बंदरांवर मोठी आग लागली. या हल्ल्यामुळे दोन्ही बंदर शहरांमध्ये धुराचे लोट पसरले आहेत. लोक घाबरून किनारी भाग सोडून आत पळत आहेत.
India Pakistan War :'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
पाकिस्तानी नौदलाचे कराची आणि ओरमारा येथे तळ आहेत. तिथे त्यांच्या उच्च अधिकाऱ्यांचे मुख्यालय, युद्धनौका आणि पाणबुड्या तैनात आहेत. या ठिकाणीच हल्ले करुन आयएनएस विक्रांतने पाकिस्तानी नौदलाला मोठ्या प्रमाणात हादरवून टाकण्यात यश मिळवले आहे. सध्या भारतीय नौदलाचे ऑपरेशन सुरू आहे.
ज्याची पाकिस्तानला भीती तेच झालं
अरबी समुद्रात आयएनएस विक्रांतच्या तैनातीची पाकिस्तानला आधीच भीती होती. या विमानवाहू जहाजामध्ये ३० मिग २९के लढाऊ विमान आहेत . हे भारताचे पाण्यात तरंगणारे हवाई तळ आहे. या विमानवाहू जहाजासोबत अनेक विध्वंसक, फ्रिगेट्स, इंधन भरणारी जहाजे आणि पाणबुड्यांचा ताफा आहे. यामुळे या युद्धनौकेला टक्कर देणे अशक्य आहे.