India Pakistan War Latest News: भारताच्या कारवाईने बिथरलेल्या पाकिस्तानने आज(दि.8) रात्री 9-10 च्या सुमारास अचानक भारतावर ड्रोन हल्ले सुरू केले. याला भारतीस सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले असून, पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले आहेत. याशिवाय, भारताने पाकिस्तानच्या लाहोरमध्ये घुसून हल्ले केल्याचीही माहिती समोर आली आहे.
राजस्थान सीमेवर हालचाल वाढलीया तणावादरम्यान पाकिस्तान आता जमिनीवर युद्ध सुरू करण्याची तयारी करत आहे. गुप्तचर सूत्रांच्या माहितीच्या आधारे मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जातोय की, पाकिस्तान आपल्या रहिम यार खान आणि बहावलपूर भागातून भारत-पाकिस्तान सीमेवर आपले रणगाडे पाठवत आहे. मोठ्या संख्येने रणगाडे आणि सैनिक सीमेवर पाठवले जात आहेत.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने केलेल्या स्ट्राइकनंतर पाकिस्तानने एकीकडे हवाई हल्ले सुरू केले, तर दुसरीकडे हे रणगाडे पाठवले जात आहेत. पाकिस्तानचे रहिम यार खान आणि बहावलपूर भाग भारतीय राजस्थान राज्याला चिटकून आहेत. राजस्थानच्या या जिल्ह्यांमध्ये जैसलमेर आणि बिकानेर यांचा समावेश आहे.