India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 15:42 IST2025-05-08T15:42:22+5:302025-05-08T15:42:22+5:30
India Pakistan Tension: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्या तणाव निर्माण झाला होता. भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तान पिसाळला आहे.

India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान वेडापिसा झाला आहे. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्काराकडून अंदाधूंद गोळीबार केला जात आहे. जम्मू आणि काश्मीर, पंजाबमधील सीमेवरील गावांमध्ये उखळी तोफा आणि तोफगोळे डागण्याचे प्रयत्न झाले. ७ आणि ८ मे च्या रात्री पाकिस्तानकडून जम्मू आणि काश्मीरमध्ये काही हल्ले करण्याचे प्रयत्न झाले, पण भारतीय लष्कराने पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पाडले आहेत. संरक्षण मंत्रालयाने याबद्दलची माहिती दिली आहे. (Pakistan attempted to engage a number of military targets in Northern and Western India)
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी याबद्दलची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारताने पाकिस्तान लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले नव्हते. पण, पाकिस्तान लष्कराकडून जर भारतीय लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल.
पाकिस्तानकडून मध्यरात्री हल्ल्याचे प्रयत्न
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ७ आणि ८ मे रोजीच्या मध्यरात्री पाकिस्तानने उत्तर आणि पश्चिमेकडील काही लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न केले. यात अवंतीपोरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, अदमपूर, भटिंडा, चंदीगढ, नाल, फलौदी, उत्तरलाई आणि भूज या ठिकाणांचा समावेश आहे.
वाचा >>भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
पाकिस्तानने ड्रोन आणि मिसाईल हल्ले करण्याचा प्रयत्न केला. यूएसए ग्रीड आणि हवाई संरक्षण सिस्टिमच्या मदतीने त्यांच्या मिसाईल आणि ड्रोन पाडण्यात आले. अनेक ठिकाणी पाडण्यात आलेल्या ड्रोन्स आणि मिसाईलचे सांगाडे सापडले आहेत. त्यातून पाकिस्तानकडून हल्ले करण्यात आल्याचे सिद्ध झाले आहे.
लाहोरमधील एअर डिफेन्स रडार केले निकामी
अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय लष्कराने पाकिस्तानची ठिकठिकाणची हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त केले. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याप्रमाणेच भारताने उत्तर दिले. जी माहिती मिळाली आहे, त्यानुसार लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टिम निकामी करण्यात यश आले आहे.
पाकिस्तानच्या गोळीबारात १६ नागरिकांचा मृत्यू
अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानी लष्कराकडून सीमेलगतच्या गावात अंदाधूं गोळीबार केला जात आहे. यात आतापर्यंत १६ नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. यात तीन महिला आणि पाच लहान मुलांचा समावेश आहे. भारतीय जवानही पाकिस्तानच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देत आहेत.