हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 19:30 IST2025-05-05T19:25:24+5:302025-05-05T19:30:43+5:30
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे.

हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव खूप वाढला आहे. भारतानेपाकिस्तानविरुद्ध अनेक महत्वाची पाऊले उचलली आहेत. भारताच्या कठोर कारवाईमुळे पाकिस्तानी सरकार आणि लष्कर प्रचंड तणावाखाली आहे. अशातच आता केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना एक महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
MHA asks several states to conduct mock drills for effective civil defence; drills to include crash blackout measures
— ANI Digital (@ani_digital) May 5, 2025
Read @ANI Story | https://t.co/Cg2f0SWCf3#MHA#mockdrillspic.twitter.com/WxnenobwWJ
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना प्रभावी नागरी सुरक्षेसाठी 7 मे रोजी मॉक ड्रिल आयोजित करण्यास सांगितले आहे. हे मॉक ड्रिल हवाई हल्ल्याशी संबंधित असेल. राज्यांना हवाई हल्ल्याच्या इशारा देणारे सायरन वाजवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हवाई हल्ल्याच्या सायरनच्या बाबतीत नागरिकांना बचावकार्याचे प्रशिक्षण दिले जाईल.
मॉक ड्रिल दरम्यान खालील उपाययोजना केल्या जातील
- सायरनद्वारे हवाई हल्ल्याचा इशारा जारी केला जाईल.
- शत्रूच्या हल्ल्याच्या बाबतीत स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नागरी संरक्षण पैलूंवर सामान्य नागरिक आणि विद्यार्थी इत्यादींना प्रशिक्षण दिले जाईल.
- क्रॅश ब्लॅक आउट उपायांची तरतूद
- निर्वासन योजनेचे अद्ययावतीकरण आणि सराव.