पाकिस्तानने जम्मू, राजस्थान, पंजाबवर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला, जो भारतीय सैन्याने उधळून लावला. भारताच्या एस-४००ने पाकिस्तानचे सगळे ड्रोन पाडून टाकले. यानंतर, भारताने पाकिस्तानला अशा प्रकारे उत्तर दिले की इस्लामाबाद, कराची आणि लाहोरसह अनेक शहरांमध्ये अराजकता पसरली. या शहरांवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पडला. भारताचे हे नियोजन पाहून पाकिस्तानही चांगलाच घाबरला. अवघ्या ३५ मिनिटांत भारतीय सेनेने पाकिस्तानचा धुव्वा उडवला.
भारताने पाकिस्तानच्या ८ शहरांवर हल्ला करून प्रत्युत्तर दिले आहे. यामध्ये लाहोर, इस्लामाबाद, कराची, सियालकोट, बहावलपूर, पेशावर या शहरांचा समावेश आहे. याशिवाय, भारतीय लष्कराने पीओकेमधील मुझफ्फराबाद आणि कोटली येथे क्षेपणास्त्रे डागली आहेत. भारताने लाहोरमध्ये पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली. तिन्ही सैन्यांनी पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
आयएनएस विक्रांतची धडाकेबाज कामगिरी!
भारतीय नौदलाने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आणि कराची बंदरावर १० क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. भारताने समुद्री हल्ल्यात पाकिस्तानचे कराची बंदर उद्ध्वस्त केले आहे. अरबी समुद्रात तैनात असलेल्या आयएनएस विक्रांतमुळे ही मोठी कारवाई घडली होती. नौदलाच्या हल्ल्यामुळे कराची बंदरासह शहरातील अनेक भागात नुकसान झाले आहे.
पाकिस्तानला उत्तर देण्यास भारतीय सैन्य तयार!
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पूंछ आणि राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार करण्यात आला आहे. भारतीय सैन्याकडून योग्य उत्तर दिले जात आहे. सीमावर्ती भागातील लोकांना बंकरमध्ये हलवण्यात आले आहे. त्याच वेळी, दिल्ली आणि गुजरातमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आले आहेत. याशिवाय, उत्तर प्रदेश-हिमाचलमध्येही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जैसलमेर, अमृतसर, जम्मूसह २४ विमानतळं बंद करण्यात आले आहेत आणि प्रवाशांसाठी सूचना जारी करण्यात आल्या आहेत. प्रवाशांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना विमानतळावर ३ तास आधी पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.