'चर्चेसाठी दहशतवादमुक्त वातावरण हवे', शहबाज शरीफांना मोदी सरकारचे सडेतोड उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 18:37 IST2023-08-03T18:36:50+5:302023-08-03T18:37:14+5:30
Ind Vs Pak Talks: पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताशी चर्चा सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

'चर्चेसाठी दहशतवादमुक्त वातावरण हवे', शहबाज शरीफांना मोदी सरकारचे सडेतोड उत्तर
Narendra Modi Vs Shehbaz Sharif: पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ(Shehbaz Sharif) यांनी मंगळवारी भारताशी पुन्हा चर्चा सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली होती. गंभीर मुद्द्यांवर शांततापूर्ण पद्धतीने चर्चा होईपर्यंत दोन्ही देश 'सामान्य शेजारी' होऊ शकत नाहीत, असे शाहबाज म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे.
#WATCH हमने रिपोर्टें देखी हैं। भारत का रुख इस बात पर कायम है कि हम सभी देशों के साथ मैत्रीपूर्ण संबंध चाहते हैं...लेकिन इसके लिए आतंक और शत्रुता से मुक्त वातावरण जरूरी है: देशों के बीच बातचीत को लेकर पाकिस्तान के पीएम शहबाज शरीफ की भारत पर टिप्पणी पर विदेश मंत्रालय के प्रवक्ता… pic.twitter.com/GpsATHFJMf
— ANI_HindiNews (@AHindinews) August 3, 2023
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, भारतालाही आपल्या शेजाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत, पण त्यासाठी दहशतवादमुक्त वातावरण आवश्यक आहे. आम्ही रिपोर्ट पाहिली, सर्व देशांशी मैत्रीपूर्ण संबंध हवेत, अशी भारताची भूमिका आहे. त्यासाठी दहशतवाद आणि शत्रुत्वमुक्त वातावरण गरजेचे आहे.
मंगळवारी पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले होते की, सर्व गंभीर आणि प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी त्यांना भारतासोबत चर्चा करायची आहे. दोन्ही देश गरिबी आणि बेरोजगारीशी लढत असल्याने युद्ध हा दोन्ही देशांसाठी पर्याय नाही. काश्मीरसह सीमापारचा दहशतवाद आणि भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शरीफ यांचे वक्तव्य आले आहे.