India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 13:13 IST2025-05-09T13:10:23+5:302025-05-09T13:13:47+5:30

पाकिस्तानने भारतीय लष्कराच्या तळांना लक्ष्य करत मिसाईल डागल्या. पण, भारताने त्या हाणून पाडल्या. हवेतच निष्क्रिय करण्यात आलेल्या या मिसाईल आता सापडल्या आहेत. 

India Pakistan: Pakistan's missiles burst like firecrackers; Downed missiles found in Punjab, watch video | India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ

India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ

India Pakistan Conflict : ६-७ मे रोजीच्या रात्री भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उडवले. या लष्करी कारवाईनंतर पाकिस्तानने ८ मे रोजीच्या रात्री भारतीय सैन्य तळांवर हवाई हल्ल्याचे प्रयत्न केले. पाकिस्तानने ड्रोन्स आणि मिसाईल्स डागल्या, पण त्या हवेत फुस्स झाल्या. भारताच्या लष्कराने केलेल्या वारामुळे या मिसाईल आणि ड्रोन्सचे सांगाडेच जमिनीवर पोहोचले. यातील काही निष्क्रिय करण्यात आलेल्या मिसाईल सापडल्या आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

भारताच्या दहशतवादी कारवाईनंतर पाकिस्तानी लष्कराने गुरुवारी (८ मे) रात्री अचानक निष्फळ हवाई हल्ले केले. जम्मू, पंजाब, राजस्थान या राज्यातील लष्करी तळे आणि गावांवर पाकिस्ताने ड्रोन्स डागण्याचे प्रयत्न केले, जे पूर्णपणे हाणून पाडण्यात आले. 

वाचा >>"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलबद्दल खुलासा

पाकिस्तानच्या मिसाईल पाडल्या

भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या मिसाईल हवेतच नष्ट केल्या. भारताच्या डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानी मिसाईल हवेतच टिपल्या. या मिसाईल्स आकाशातच निष्क्रिय झाल्या आणि जमिनीवर पडल्या. ज्या भागात या मिसाईल पडल्या होत्या. त्या परिसरात शोध मोहीम करण्यात आली. या निष्क्रिय मिसाईल्स सापडल्या आहेत. 

पंजाबमधील होशियारपूरमध्ये सापडलेली पाकिस्तानी मिसाईल

होशियारपूर येथील कमाही देवीच्या डोंगराळ भागात मिसाईल सापडली आहे. सर्वात आधी ग्रामस्थांना मिसाईलचे अवशेष दिसले. त्यांनी लगेच पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिसर बंद केला. 

 

पाकिस्तानने भारतावर डागलेल्या आणखी एका मिसाईलचे अवशेष पंजाबमधीलच बठिंडामध्ये सापडले आहेत. 

बठिंडामधील बीड तलाव गल्ली नंबर ४ परिसरातील दर्ग्याजवळ मिसाईल्सचे पार्ट्स मिळाले आहेत. या मिसाईलचे काही पार्ट्स निष्क्रिय केले जाणार आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी घरातच राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

Web Title: India Pakistan: Pakistan's missiles burst like firecrackers; Downed missiles found in Punjab, watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.