Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 16:58 IST2025-05-10T16:56:52+5:302025-05-10T16:58:15+5:30
India Pakistan Conflict:पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच दोन्ही देशांकडून एकमेकांवर विविध हत्यारांद्वारे हल्ले केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Act of War: गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या दहशतवादी कारवाया हे आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी गंभीर आव्हान ठरले आहे. हल्लीच २२ एप्रिल २०२५ रोजी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे हल्ला करून २६ पर्यटकांची हत्या केली होती. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच दोन्ही देशांकडून एकमेकांवर विविध हत्यारांद्वारे हल्ले केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
यापुढे भारताच्या भूमीवरही कुठलाही दहशतवादी हल्ला हे भारताविरोधातील युद्धाची कारवाई मानली जाईल, तसेच त्याला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जाईल, अशी माहिती केंद्र सरकारमधील वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे.
Any future 'act of terror' will be considered an 'act of war' against India: Top govt sources
— ANI Digital (@ani_digital) May 10, 2025
Read @ANI Story | https://t.co/Wf5qjlhjdZ#India#Pakistan#Governmentpic.twitter.com/nyqakphVQv
गेल्या महिन्यात पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यंटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधी दहशतवादी तळांवर हल्ले करत पाकिस्तानला जबर दणका दिला होता. तेव्हापासून आतापर्यंत दोन्ही देशांकडून एकमेकांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ले केले जात आहेत. त्यात भारताच्या सक्त कारवाईमुळे बिथरलेला पाकिस्तान भारतातील नागरी वस्त्यांनाही लक्ष्य करत आहे. तर भारताने मात्र पाकिस्तानमधील हवाई तळ, दहशतवाद्यांचे अड्डे आणि लष्करी केंद्रांना लक्ष्य केले आहे.