शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 05:48 IST

चीनने भारत आणि पाकिस्तानला शांततेचे तसेच दोन्ही देशांतील तणावावर वाटाघाटीच्या मार्गाने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

नवी दिल्ली: चीनने भारत आणि पाकिस्तानला शांततेचे तसेच दोन्ही देशांतील तणावावर वाटाघाटीच्या मार्गाने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू, असे चीनने म्हटले आहे. दोन्ही देशांच्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून असून तणावाची आम्हाला चिंता वाटते. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने जारी केलेल्या निवेदनात पुढे म्हटले की, आम्ही दोन्ही देशांना विनंती करतो की, त्यांनी शांतता व स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने काम करावे.

पंतप्रधानांकडून उच्चस्तरीय बैठक

भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंथी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सायंकाळी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यामध्ये शस्त्रसंथीनंतरच्या स्थितीवर तसेच लष्करी सज्जतेबाबत चर्चा करण्यात आल्याचे कळते. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख उपस्थित होते. पहलगाममध्ये हल्ला करून २६ जणांची हत्या करणारे व या कटामागील सूत्रधारांना त्यांनी कल्पना केली नसेल, अशी कठोर कारवाई करू, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता.

आकाश, बराक अन् 'शिल्का'ने मोडले पाकिस्तानचे कंबरडे

पाकची अनेक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले भारताने उद्ध्वस्त केले. हे शक्य झाले भारताच्या भक्कम संरक्षण प्रणालीमुळे. एस-४००, आकाश क्षेपणास्त्र प्रणाली तर भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीची ताकद आहे, मात्र तोफा व क्षेपणास्त्रांनी भक्कम असलेली आपली सुरक्षा प्रणाली पाकच्या चारीमुंड्या चीत करण्यास सक्षम आहे.

यूट्यूब चॅनेल ब्लॉक; कोर्टात सुनावणी

केंद्र सरकारकडून यूट्यूब चॅनेल 'फोर पीएम' हे ब्लॉक करण्याचा आदेश देण्यात आला आहे. हा आदेश रद्द करण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात १३ मे रोजी सुनावणी घेतली जाणार आहे. न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल. कोर्टाने 'फोर पीएम' या डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मचे संपादक संजय शर्मा यांच्या याचिकेवर केंद्र सरकार आणि इतरांकडून उत्तर मागितले आहे. चॅनेलचे ब्लॉकिंग म्हणजे पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर आक्रमण असून जनतेला माहिती मिळवण्याच्या अधिकारावरदेखील मोठा आघात आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानchinaचीन