जागतिक बाजारपेठेत भारत पुन्हा ताकद दाखवणार; फक्त एका निर्णयानं पाकिस्तानला घाम फुटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 19:10 IST2025-03-24T19:09:12+5:302025-03-24T19:10:29+5:30
निर्बंधामुळे आशिया-उत्तर अमेरिकेत लोकांनी भीतीपोटी अधिक तांदूळ खरेदी करणे सुरू केले. आशियाई बेंचमार्कमध्ये तांदळाची किंमत २००८ नंतर सर्वाधिक झाली होती.

जागतिक बाजारपेठेत भारत पुन्हा ताकद दाखवणार; फक्त एका निर्णयानं पाकिस्तानला घाम फुटला
नवी दिल्ली - भारताने तांदूळ निर्यातीवर लावलेले बंदी हटवली आहे. कृषी उत्पादन निर्यात दुप्पट करून देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश आहे. भारताने या महिन्यापासून तांदूळ निर्यातीवर लावलेले सर्व निर्बंध हटवण्याने इतर देशांवर दबाव वाढला आहे. थायलँडमध्ये सफेद तांदळाची किंमत ४०५ डॉलर प्रतिटन आहे. जानेवारी २०२४ मध्ये हे दर ६६९ डॉलर इतके होते. भारत सध्या कृषी आणि खाद्य निर्यात वाढवण्यावर भर देत आहे त्यावेळी हा निर्णय सरकारने घेतला आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार आहे. अर्थव्यवस्थेला गती मिळेल. भारतातील १४० कोटी लोकसंख्येत ४२ टक्क्याहून अधिक लोक शेतीवर निर्भर आहेत. भारताच्या या पाऊलामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तांदूळ किंमतीत घट पाहायला मिळेल. त्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान होणार आहे. २०३० पर्यंत १०० अब्ज डॉलर कृषी आणि खाद्य उत्पादन निर्यात करण्याचं टार्गेट भारताचं आहे. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी माहिती दिल्यानुसार, २०२३-२४ मध्ये ४८.१५ अब्ज डॉलर निर्यात दुप्पट झाली आहे. मागील वर्षी भारताने जवळपास ५० अब्ज डॉलर निर्यात केले होते. परंतु देशातील वाणिज्य मंत्रालय आणखी मोठं यश मिळवू इच्छिते असं त्यांनी सांगितले.
तसेच सरकारने साखरेच्या निर्यातीवरील काही निर्बंध हटवले आहेत. आम्हाला येत्या काळात भारत १०० अब्ज डॉलरचा आकडा पार करेल अशी अपेक्षा आहे असा विश्वास वाणिज्य मंत्री गोयल यांनी व्यक्त केला. भारताने २०२२ साली तांदूळ निर्यातीवर कठोर निर्बंध आणले होते. रशिया-युक्रेन युद्धानंतर किंमती वाढल्याने देशात तांदूळ कमी पडण्याची भीती होती. निर्बंधामुळे आशिया-उत्तर अमेरिकेत लोकांनी भीतीपोटी अधिक तांदूळ खरेदी करणे सुरू केले. आशियाई बेंचमार्कमध्ये तांदळाची किंमत २००८ नंतर सर्वाधिक झाली होती.
भारताने सप्टेंबर महिन्यापासून निर्यातीवरील निर्बंध कमी करण्याचं काम सुरू केले होते. भारताने २०२३ साली १.४ कोटी टन तांदूळ निर्यात केला होता. सप्टेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२५ या काळात भारत २.१५ कोटी टन तांदूळ निर्यात होऊ शकते. हा एक रेकॉर्ड आहे. जर भारताने ५.४ - ५.५ कोटी टनाच्या जागतिक बाजारपेठेत २ कोटीहून अधिक टन तांदूळ निर्यात केले तर बाजारपेठेत लाट येईल. भारत तांदूळ बाजारात आल्याने पाकिस्तानचे नुकसान होणार आहे. भारताने निर्यात बंदी केल्यानंतर पाकिस्तानने इंडोनेशिया-पूर्व अफ्रिका देशात त्यांचं स्थान बनवले होते. भारताने सप्टेंबरमध्ये निर्बंध कमी केल्यानंतर पाकिस्तान गैर बासमती तांदूळ किंमत रातोरात ८५० डॉलरहून ६५० डॉलर प्रतिटन झाले होते.