आप-काँग्रेसचा वाद मिटला? मुंबईतील बैठकीला हजर राहणार, CM केजरीवालांची माहिती...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 15:04 IST2023-08-21T15:03:48+5:302023-08-21T15:04:15+5:30
I.N.D.I.A Meeting In Mumbai: 31ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत विरोधकांच्या INDIA आघाडीची बैठत होणार आहे.

आप-काँग्रेसचा वाद मिटला? मुंबईतील बैठकीला हजर राहणार, CM केजरीवालांची माहिती...
Arvind Kejriwal On INDIA Meeting: विरोधकांच्या INDIA आघाडीची तिसरी बैठत राज्याची राजधानी मुंबईत होणार आहे. या बैठकीत आपचे राष्ट्रीय निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील AAP देखील सहभागी होणार आहे. स्वतः केजरीवाल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
मुंबईत 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला इंडिया आघाडीची बैठक होणार आहे.एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पत्रकारांशी बोलताना केजरीवाल म्हणाले की, "आम्ही मुंबईला जाऊ आणि जी काही रणनीती बनवली जाईल, त्याची माहिती तुम्हाला देऊ." अलीकडेच दिल्लीतील लोकसभेच्या जागांवरुन आप आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर, आपच्या उपस्थितीवर शंका उपस्थित केल्या जात होत्या. आता स्वतः केजरीवालांनी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली आहे.
#WATCH | "We will go to Mumbai and will let you know whatever the strategy is", says AAP Convener & Delhi CM Arvind Kejriwal on the upcoming INDIA alliance meeting pic.twitter.com/1eXVBwmdUJ
— ANI (@ANI) August 21, 2023
इंडिया आघाडीच्या मुंबईत होणाऱ्या तिसर्या बैठकीला 26 हून अधिक राजकीय पक्षांचे सुमारे 80 नेते उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. सध्या 26 पक्ष युती गटाचा भाग आहेत आणि दोन दिवसांच्या बैठकीत आणखी काही पक्ष युतीमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. या बैठकीत युतीच्या लोगोचेही अनावरण होण्याची शक्यता आहे.