शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 20:19 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळात गेलेल्या भारतीय हवाई दलाच्या ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्याशी संवाद साधला.

PM Modi Spoke Indian Astronaut Shubhanshu Shukla: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अ‍ॅक्सियम मिशन ४ वर असलेले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. पंतप्रधान कार्यालयाने या संभाषणाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. दोघांमध्ये १८ मिनिटे संभाषण सुरु होतं. शुभांशू आज तुम्ही भारतीय भूमीपासून दूर आहात पण भारतीयांच्या सर्वात जवळ असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. यावेळी शुभांशू शुक्ला यांनी पृथ्वीवर कोणत्याही सीमा नाहीत, आपण सर्व एक आहोत, असं म्हटलं.

४१ वर्षांनंतर अवकाशात पोहोचलेले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद सावदा. संभाषणादरम्यान शुभांशू यांनी अंतराळातील त्यांचे अनुभव सांगितले. तसेच जागतिक स्तरावर भारत आज अवकाश विज्ञानात किती आघाडीवर आहे हे त्यांनी सांगितले. भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू हे दोन दिवसांपूर्वी २६ जून रोजी दुपारी ४.०१ वाजता २८ तासांच्या प्रवासानंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले आहेत. त्यानंतर आज पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी गप्पा मारल्या.

"तुम्हा सर्वांच्या आशीर्वाद आणि प्रेमामुळे इथे येऊन खूप छान वाटत आहे. पृथ्वीपासून कक्षेपर्यंतचा माझा ४०० किमीचा प्रवास खूप महत्त्वाचा होता. मी अंतराळात माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करत असताना आज मला अभिमान वाटतोय. हा प्रवास फक्त माझा नाही तर संपूर्ण देशाचा प्रवास आहे. तुमच्या नेतृत्वाखाली आजचा भारत आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अनेक संधी देतोय," असं शुभांशू शुक्ला यांनी म्हटलं. यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, प्रत्येक भारतीय पाहत आहे की तुम्ही किती साधे आहात. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना गाजराचा हलवा दिला का? यावर शुभांशू यांनी हो, मी माझ्या सहकाऱ्यांना गाजराचा हलवा दिला, असं सांगितलं.

त्यानंतर पंतप्रधान मोदींनी तुम्हाला पृथ्वी मातेला प्रदक्षिणा घालण्याची संधी मिळाली आहे, तुम्ही सध्या कुठे आहात? असं विचारलं. त्यावर शुभांशू यांनी, आम्ही निश्चित सध्या कुठे आहोत सांगता येणार नाही. आम्ही १६ वेळा प्रदक्षिणा घालतो, १६ सूर्योदय आणि १६ सूर्यास्त पाहतो. आम्ही २८ हजार किमी/तास वेगाने प्रवास करतो. हा वेग आपला देश किती वेगाने पुढे जात आहे हे दर्शवतो, असं म्हटलं.

"पहिले दृश्य पृथ्वीचे होते. ते पाहिल्यानंतर माझ्या मनात पहिला विचार आला की पृथ्वी एकसारखीच आहे. बाहेरून कोणतीही सीमारेषा किंवा सीमा दिसत नाही. जेव्हा मी भारत पाहिला तेव्हा तो खूप भव्य आणि मोठा दिसत होता. पृथ्वी विविधतेत एकता दर्शवते. पृथ्वी आपले घर आहे आणि आपण सर्व एक आहोत," असंही शुभांशू शुक्ला यांनी म्हटलं.

बोलण्यासाठी बांधले पाय

शुभांशूने पंतप्रधान मोदींना सांगितले की, "तुमच्याशी बोलताना मी माझे पाय बांधले आहेत कारण येथे गुरुत्वाकर्षण शून्य आहे. जर मी हे केले नाही तर मी तरंगायला सुरुवात करेन. इथे झोपणे हे एक मोठे आव्हान आहे. चालणे, खाणे-पिणे हे देखील आव्हान आहे. कारण आपल्या शरिराला गुरुत्वाकर्षणाची खूप सवय झालेली असते, त्यामुळे इथे ते सर्व खूप कठीण होते."

भारताच्या गगनयान मोहिमेच्या यशाचा हा पहिला अध्याय - पंतप्रधान मोदी

"आज मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की भारताच्या गगनयान मोहिमेच्या यशाचा हा पहिला अध्याय आहे. तुमचा हा ऐतिहासिक प्रवास केवळ अवकाशापुरता मर्यादित नाही, तर तो विकसित भारताच्या आपल्या प्रवासाला गती आणि नवीन बळ देईल. भारत आता जगासाठी अवकाशातील नवीन उपक्रमांसाठी दरवाजे उघडणार आहे. आता भारत केवळ उड्डाण करणार नाही, तर भविष्यात नवीन उड्डाणांसाठी व्यासपीठ तयार करेल," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीisroइस्रोNASAनासा