'संपूर्ण जगाला दिशा दाखवणारा भारत एकमेव ध्रुवतारा'- RSS प्रमुख मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 22:00 IST2025-03-04T21:59:37+5:302025-03-04T22:00:56+5:30

'येत्या काळात भारताला एक आदर्श सामाजिक मॉडेल म्हणून सादर करावे लागेल, जे संपूर्ण जगाला शांतता आणि सौहार्दाच्या दिशेने नेण्यास सक्षम असेल.'

'India is the only pole star in the whole world'- RSS chief Mohan Bhagwat | 'संपूर्ण जगाला दिशा दाखवणारा भारत एकमेव ध्रुवतारा'- RSS प्रमुख मोहन भागवत

'संपूर्ण जगाला दिशा दाखवणारा भारत एकमेव ध्रुवतारा'- RSS प्रमुख मोहन भागवत

RSS Chief Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कार्यकर्त्यांना त्यांच्या कृतीतून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सतत काम करण्याचे आवाहन केले. तसेच, सज्जन शक्ती जागरण हा संघाच्या आगामी कार्यक्रमांचा महत्त्वाचा भाग असल्याचे सांगितले. ते मंगळवारी (4 मार्च 2025) भोपाळमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

शारदा विहार येथील सरस्वती विद्या मंदिर निवासी शाळेत पूर्णवेळ कार्यकर्त्यांसाठी 5 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात मोहन भागवत यांनी हजेरी लावली. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना भागवत म्हणाले, 'जगात होत असलेल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक बदलांना योग्य दिशा देणारा भारत हा एकमेव ध्रुव तारा आहे. केवळ आर्थिक प्रगतीपुरते मर्यादित न राहता माणुसकी, करुणा आणि सत्य या मूलभूत तत्त्वांवर आधारित समाज निर्माण करा, असेही ते यावेळी म्हणाले.

जगात शांतता राखण्यास भारत सक्षम
प्रसिद्धी पत्रकानुसार, भागवत पुढे म्हणतात, जगात होत असलेल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक बदलांना भारताच्या चिरंतन परंपरेच्या प्रकाशात दिशा देण्याची गरज आहे आणि आज जागतिक परिस्थितीत अनेक विकृती उदयास येत असताना भारत हा एकमेव ध्रुव तारा आहे, जो योग्य दिशा देऊ शकतो. यावेळी भागवतांनी समाजात नैतिक आणि सांस्कृतिक मूल्ये पुनर्संचयित करण्याच्या गरजेवर भर दिला. येत्या काळात भारताला एक आदर्श सामाजिक मॉडेल म्हणून सादर करावे लागेल, जे संपूर्ण जगाला शांतता आणि सौहार्दाच्या दिशेने नेण्यास सक्षम असेल, असेही ते म्हणाले.

संघाच्या कार्याचे जागतिक महत्त्व
विद्या भारतीचे कौतुक करताना भागवत म्हणतात, केलेले काम जागतिक पातळीवर पाहिले जात आहे आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनीही त्याची व्याप्ती स्वीकारली आहे. यावरून हे सिद्ध होते की, संघ आणि त्याच्याशी संलग्न संघटनांचे कार्य केवळ भारतापुरते मर्यादित नाही, तर त्याला जागतिक महत्त्व आहे. यावेळी आरएसएस प्रमुखांनी सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या विचार आणि कृतीतून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सतत काम करण्याचे आवाहन केले. 

Web Title: 'India is the only pole star in the whole world'- RSS chief Mohan Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.