भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 08:08 IST2025-12-31T08:07:27+5:302025-12-31T08:08:30+5:30
आगामी अडीच ते तीन वर्षात भारत जर्मनीलाही मागे टाकेल, असा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे...

भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
नवी दिल्ली : जागतिक अर्थव्यवस्थेच्या पटलावर भारताने आज एक नवा इतिहास रचला आहे. जपानला मागे टाकत भारत आता जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनला असून, भारताचा जीडीपी ४.१८ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला आहे. केंद्र सरकारने मंगळवारी ही अधिकृत घोषणा केली.
आगामी अडीच ते तीन वर्षात भारत जर्मनीलाही मागे टाकेल, असा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे.
अर्थव्यवस्थेची दमदार कामगिरी
जीडीपीचा वेग :
२०२५-२६ च्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा विकास दर ८.२% नोंदविला गेला, जो गेल्या सहा तिमाहीमधील उच्चांक.
अंतर्गत ताकद :
दैनंदिन गरजांवर सामान्यांचा खर्च व शहरी मागणीतील वाढ यामुळे देशाची अर्थव्यवस्था भक्कम राहिली.
वेगवान वाढ :
भारताची अर्थव्यवस्था सध्या जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था ठरली आहे.
महागाईवर नियंत्रण :
महागाईचा दर मर्यादेत असून, बेरोजगारीचे प्रमाणही घटत असल्याचे सरकारने नमूद केले.
जागतिक क्रमवारी आता अशी: अमेरिका। चीन। जर्मनी।
भारत। जपान