शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 15:18 IST

Israel vs India War: इराणमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे, यामुळे या विद्यार्थ्यांशी पालकांचा काहीच संपर्क होत नाहीय. तेहरान जळत आहे, इस्रायल एकावेळी २००-२०० विमाने घुसवून हल्ले करत आहे.

भारतावर तीन वर्षांनी पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती उद्भवली आहे. भारतातील हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेले होते. रशियाने हल्ले चढविल्यानंतर हे विद्यार्थी मिसाईलच्या छायेत अडकले होते. तेव्हा एअर इंडियाच या विद्यार्थ्यांसाठी धावून गेली होती. या विद्यार्थ्यांना पुन्हा मायदेशात आणण्यासाठी एअर इंडियाची विमाने अहोरात्र उड्डाणे करत होती. आताही भारतावर तीच परिस्थिती आली आहे, सुमारे दीड हजार भारतीय विद्यार्थी इराणमध्ये अडकले आहेत. 

इराणमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे, यामुळे या विद्यार्थ्यांशी पालकांचा काहीच संपर्क होत नाहीय. तेहरान जळत आहे, इस्रायल एकावेळी २००-२०० विमाने घुसवून हल्ले करत आहे. १०-१५ वेळा प्रयत्न केला तर कुठे जाऊन १ फोन लागत आहे, आमची मुले तिथे सुरक्षित नाहीत. सरकारने त्यांना बाहेर काढावे, असे आवाहन पालकांनी केले आहे. याचबरोबर इराक आणि पाकिस्तानने त्यांची मुले इराणमधून बाहेर काढली आहेत, असेही त्यांचे म्हणणे आहे. 

बहुतांश विद्यार्थी हे काश्मीरचे आहेत. इराण आणि काश्मीर यांचा जवळचा संबंध आहे. शिया बहुल मुस्लिम आणि इराण यांचा ऐतिहासिक संबंध असल्याने जेव्हा जेव्हा इराणवर हल्ला होतो तेव्हा काश्मीर घाटीत, कारगिलमध्ये हे मुस्लिम नागरिक आंदोलने करतात. यावेळीही केली आहेत. यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

इस्रायलने १५ जूनला दुपारी हजत दोस्त अली हॉस्टेलवर हल्ला केला आहे. यात काही काश्मीरी विद्यार्थी जखमी झाले आहेत. या युद्धात १५०० भारतीय विद्यार्थी अडकले असल्याचे काश्मीरच्या रेहाना अख्तर हिने म्हटले आहे. दुसरीकडे इस्रायलमध्येही हमासपेक्षाही जास्त भयावह स्थिती आहे. केरळचा सूरज रंजन हा विद्यार्थी तिथे शिकत आहे. त्याने यावेळी परिस्थिती सर्वात भयानक आहे, असे म्हटले आहे. भारत आता कोणते पाऊल उचलतो याकडे या पालकांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलwarयुद्धJammu Kashmirजम्मू-काश्मीर