हा योगायोग आश्चर्यजनक; दहशतवाद्यांचा त्यांच्याच घरात घुसून खात्मा करतोय भारत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 06:09 IST2023-09-25T06:08:53+5:302023-09-25T06:09:44+5:30
नव्या धोरणाने जग अचंबित

हा योगायोग आश्चर्यजनक; दहशतवाद्यांचा त्यांच्याच घरात घुसून खात्मा करतोय भारत!
डॉ. खुशालचंद बाहेती
नवी दिल्ली : आता जग भारताकडे निःसंकोचपणे जबरदस्त ताकदीने शत्रूला प्रत्युत्तर देणारा कठोर देश (हार्ड स्टेट) म्हणून पाहिले जात आहे. हे ‘हार्ड स्टेट’ लेबल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या ‘संरक्षणात्मक अपराध’ सिद्धांताचे उप उत्पादन आहे. यात गुन्हेगाराला सुरक्षित वाटणाऱ्या आश्रयस्थानी जात त्याच्यावर हल्ला केला जातो. २०१९ पासून भारताचे अनेक शत्रू त्यांना सुरक्षित वाटणाऱ्या देशातच मारले गेलेत. हा योगायोग असू शकतो. परंतु या योगायोगांची संख्या पाहता याचे आश्चर्य वाटते.
nया हल्ल्यांमागे भारताचा हात होता की, नाही हे सांगता येत नाही. भारताने या घटनांमधील भूमिका ठामपणे नाकारली आहे.
nपण, जागतिक स्तरावर या घटनांमुळे भारताबद्दलची धारणा बदलत आहे.
nभारताकडे आता एक कठोर, क्षमा न करणारा, जशास तसे उत्तर देणारा देश म्हणून पाहिले जाते.