चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 16:00 IST2025-11-15T15:46:23+5:302025-11-15T16:00:50+5:30
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने आपली सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याचं काम हाती घेतले आहे.

चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
मुंबई - चीन आणि पाकिस्तानभारताविरोधात रहस्यमयपणे इेलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्धाची तयारी करत आहेत का? अशी शंका निर्माण झाली आहे. भारताने मुंबई फ्लाइट इन्फॉर्मेशन रिजनमध्ये (FIR) GPS हस्तक्षेपाबाबत एक NOTAM जारी केला आहे. जो अरबी समुद्रापर्यंत पसरला आहे. म्हणजेच या क्षेत्रात कुणीतरी आपली GPS क्षमता हॅक करत जाम करत आहे म्हणजे त्यात हस्तक्षेप केले जात आहे. हे क्षेत्र भारतातील सर्वात व्यस्त हवाई मार्गात येते. त्यामुळे या नोटमला इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध सुरू होण्याचे मोठे संकेत मानले जात आहेत.
त्याशिवाय अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे की, कुणी आपल्या क्षेत्रात इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्धाची क्षमता तपासण्याचा प्रयत्न करत आहे? किंवा आपण स्वत:च ही क्षमता चाचणी करत आहोत? याआधीही केंद्राने भारतात असे नोटम जारी केले होते. जीपीएस संबंधित नोटमचा अर्थ या क्षेत्रात कुठलेही विमान प्रवेश करेल तर त्याचे जीपीएस सिग्नल जाम होतील, त्यांना जीपीएस मिळणार नाही.
इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्धाची जगात एन्ट्री
नवी दिल्लीनंतर मुंबईत असं घडणे याचा अर्थ भारत आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे विद्युत चुंबकीय युद्धाच्या जगात एन्ट्री घेत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने आपली सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याचं काम हाती घेतले आहे. कदाचित भारताने अत्याधुनिक युद्धाचा धोका ओळखला असेल किंवा यावेळी चीन आणि पाकिस्तान आपल्याविरोधात कुठले अदृश्य युद्ध करत आहेत की आपणच आपली क्षमता पडताळून पाहत आहोत हे येणाऱ्या काळात कळेल.
India issues a NOTAM warning aircraft of GPS interference/loss around air traffic routes within its airspace near Mumbai, this follows reports of similar interreference observed around New Delhi
— Damien Symon (@detresfa_) November 13, 2025
Valid: 13-17 November 2025 pic.twitter.com/N568cd9zpz
दरम्यान, सध्या हवाई युद्ध वेगाने बदलत आहे. आता इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर, जामिंग, स्पूफिंगमध्ये जास्त मेहनत घ्यायला हवी. जीपीएस हस्तक्षेप नोटम जारी करण्याचा अर्थ नक्कीच काही ना काही आहे, जे कदाचित अदृश्य आहे असं सुरक्षा तज्ज्ञांनी सांगितले.
दक्षिण आशियाई सुरक्षेचा धोका
युरोप, मध्य पूर्व आणि दक्षिण पूर्व आशियात अरबी समुद्राच्या या विस्तीर्ण आणि व्यस्त हवाई क्षेत्रातून दररोज शेकडो आंतरराष्ट्रीय उड्डाणे जातात. अशा संवेदनशील कॉरिडॉरवरील जीपीएस हस्तक्षेप ही केवळ विमान वाहतूक यंत्रणेसाठी समस्या नाही तर आधुनिक लष्करी सिद्धांत इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्धाच्या सुरुवातीच्या टप्प्यांमधील अदृश्य खेळाचा भाग बनते. दिल्लीनंतर मुंबईत घडलेला एफआयआर, दोन वेगवेगळ्या एफआयआरमध्ये असाच हस्तक्षेप - हा योगायोग वाटत नाही; उलट दक्षिण आशियातील हवाई संरक्षणाची चाचणी घेतली जात आहे आणि कदाचित भारत युद्धाच्या एका नवीन जगात प्रवेश करत आहे हे सूचित करते. या आठवड्यात भारत, पाकिस्तान आणि चीन हे सर्व प्रमुख लष्करी सराव आणि नौदल सरावासाठी NOTAM जारी करत होते. GPS अस्थिरतेचा हा प्रकार दक्षिण आशियाई सुरक्षेसाठी एक महत्त्वाचा धोका निर्माण करतो. याचा अर्थ असा की एक नवीन युद्ध सुरू होऊ शकते, जे क्षेपणास्त्रांनी नाही तर सिग्नल फ्रिक्वेन्सीने लढले जाऊ शकते.