भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 13:20 IST2025-11-01T13:17:13+5:302025-11-01T13:20:45+5:30
भारताने आक्रमक क्षमता विकसित केली आहे, म्हणजेच गरज पडल्यास ते राष्ट्रीय सुरक्षेच्या धोक्यांना चोख उत्तर देऊ शकतात असं डोवाल यांनी सांगितले.

भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
नवी दिल्ली - २०१३ नंतर जम्मू काश्मीर वगळता संपूर्ण देश दहशतवादी हल्ल्यापासून सुरक्षित आहे. भारताने दहशतवादावर नियंत्रण मिळवले आहे. २०१३ नंतर एकही मोठा दहशतवादी हल्ला झाला नाही असं विधान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केले आहे. सरकार पटेल स्मारक व्याख्यानात ते बोलत होते.
यावेळी अजित डोवाल म्हणाले की, तथ्य तर तथ्यच असते, त्यावर कुठलाही वाद होऊ शकत नाही. देशाने दहशतवादाशी अत्यंत प्रभावीपणे लढा दिला. १ जुलै २००५ ला दहशतवादाची मोठी घटना घडली होती. त्यानंतर अखेरची घटना २०१३ साली घडली होती. त्यानंतर जम्मू काश्मीर सोडता संपूर्ण देशात कुठेलही दहशतवादी हल्ला झाला नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच जम्मू काश्मीर पाकिस्तानसाठी गुप्त युद्धाचा आखाडा आहे. इथे वेगळा खेळ आहे. त्याशिवाय देश दहशतवादी हल्ल्यापासून सुरक्षित राहिला. यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. लोकांना अटक करण्यात आल्या. स्फोटके जप्त करण्यात आली. शत्रूच्या कारवाया सुरूच असताना देशातंर्गत कुठेही दहशतवादी हल्ला नाही. २०१४ पासून डाव्या विचारसरणीच्या दहशतवादात झपाट्याने घट झाली आहे. शत्रू अजूनही खूप सक्रिय आहे, परंतु सुदैवाने इतर भागात दहशतवादी घटना घडलेल्या नाहीत. २०१४ च्या तुलनेत ११ टक्क्यांपेक्षा कमी घटना झाल्या आहेत असं त्यांनी सांगितले.
#WATCH | Delhi | Speaking on governance at a lecture on Rashtriya Ekta Diwas, NSA Ajit Doval says, "...I take a capsule of the same last ten years... The facts are facts, and they cannot be disputed. Terrorism in this country has been effectively countered. We had a major… pic.twitter.com/JWtXySch9u
— ANI (@ANI) October 31, 2025
भारताने आक्रमक क्षमता विकसित केली आहे, म्हणजेच गरज पडल्यास ते राष्ट्रीय सुरक्षेच्या धोक्यांना चोख उत्तर देऊ शकतात. आम्ही पुरेसे सुरक्षा उपाय केले आहेत असे म्हणणे पुरेसे नाही. तितकेच महत्त्वाचे म्हणजे आपण प्रत्येक भारतीयाला अंतर्गत आणि बाह्य दोन्ही शक्तींपासून सुरक्षित वाटावे. आपण सरकारी कायदे आणि धोरणांनुसार त्यांच्याशी प्रभावीपणे सामना करू शकतो. सोबतच आपण अशी प्रतिबंधक क्षमता देखील विकसित करू शकलो ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या कोणत्याही धोक्याला सर्वोत्तम पद्धतीने प्रतिसाद देण्याची इच्छाशक्ती आणि ताकद आपल्याकडे आहे हे दिसून येते असंही अजित डोवाल यांनी म्हटलं.