९९ टक्क्यांहून अधिक भारतीय उत्पादनांना युरोपमध्ये थेट 'झीरो ड्युटी' प्रवेश मिळणार; कापड, ऑटोमोबाइल आणि आयटी क्षेत्राला मोठा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 06:21 IST2026-01-28T06:20:42+5:302026-01-28T06:21:24+5:30

India-EU FTA 2026: अमेरिकेने लादलेल्या ५० टक्के टॅरिफच्या पार्श्वभूमीवर, भारताने 'युरोपीय महासंघा'सोबतच्या ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराला (एफटीए) अंतिम रूप दिले आहे. यामुळे भारताच्या निर्यातीला नवी झळाळी मिळणार आहे.

India-EU FTA 2026: More than 99 percent of Indian products will get direct 'zero duty' access to Europe; Textile, automobile and IT sectors will benefit greatly | ९९ टक्क्यांहून अधिक भारतीय उत्पादनांना युरोपमध्ये थेट 'झीरो ड्युटी' प्रवेश मिळणार; कापड, ऑटोमोबाइल आणि आयटी क्षेत्राला मोठा फायदा

९९ टक्क्यांहून अधिक भारतीय उत्पादनांना युरोपमध्ये थेट 'झीरो ड्युटी' प्रवेश मिळणार; कापड, ऑटोमोबाइल आणि आयटी क्षेत्राला मोठा फायदा

नवी दिल्ली - अमेरिकेने लादलेल्या ५० टक्के टॅरिफच्या पार्श्वभूमीवर, भारताने 'युरोपीय महासंघा'सोबतच्या ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराला (एफटीए) अंतिम रूप दिले आहे. यामुळे भारताच्या निर्यातीला नवी झळाळी मिळणार आहे. या करारामुळे जागतिक जीडीपीमध्ये २५% वाटा असलेल्या दोन मोठ्या अर्थव्यवस्था एकत्र आल्याने भारताचे जागतिक स्थान भक्कम झाले आहे.

भारत व युरोपीय महासंघ या दोन मोठ्या अर्थव्यवस्था आहेत. आता या करारामुळे ९९ टक्के भारतीय वस्तूंना युरोपच्या बाजारपेठेत थेट प्रवेश मिळेल. विशेष म्हणजे, युरोप ९६.८ टक्के उत्पादनांवरील शुल्क पूर्णपणे हटवणार आहे. रत्ने व दागिने, कापड, चामड्याच्या वस्तू, चहा, कॉफी, मसाले, फळे या वस्तूंच्या निर्यातीस करारामुळे चालना मिळेल. तसेच आयटी व्यावसायिकांना युरोपात प्रवेश करण्यात सुलभता मिळेल.

भारत-युरोपीय महासंघाचा व्यापार किती?
भारताकडून निर्यात : डिझेल, विमान इंधन, स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, रसायने, औषधे, लोखंड व पोलाद, हिरे, दागिने
भारतात आयात : यंत्रसामग्री, औद्योगिक उपकरणे, टर्बोजेट इंजिने, मोबाईल पार्ट्स, इलेक्ट्रॉनिक चिप्स, विमाने, वैद्यकीय उपकरणे

कराराची ठळक वैशिष्ट्ये काय? 
रोजगार निर्मिती :
कापड, दागिने, चामड्याच्या वस्तू, ऑटोमोबाईल अशा कामगारप्रधान क्षेत्रातील ३३ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीवरील कर रद्द होत रोजगार वाढेल.
लघु उद्योगांना बळ : याचा थेट फायदा महिला, तरुण, कारागीर आणि एमएसएमई उद्योगांना होऊन भारतीय कंपन्या जागतिक साखळीशी जोडल्या जातील.
कालबद्ध अंमलबजावणी: भारत १० वर्षांत ९३% व्यापार मूल्यावर, तर युरोप ७ वर्षांत भारतीय वस्तूंवरील शुल्क शून्यावर आणेल.
व्यावसायिकांना संधी : केवळ वस्तूच नाही, तर कुशल भारतीय व्यावसायिकांना (प्रोफेशनल) युरोपमध्ये काम करण्यासाठी 'मोबिलिटी फ्रेमवर्क' अंतर्गत सुलभता मिळेल.
डिजिटल व्यापार : पारंपरिक वस्तूंसह डिजिटल कॉमर्स, कस्टम प्रक्रियेत सुलभता आणली जाईल.
ग्राहकांचा फायदा :  भारतीय ग्राहकांना जागतिक दर्जाच्या वस्तू रास्त दरात मिळतील.
शेतकऱ्यांना लाभ: चहा, कॉफी, मसाले, फळांच्या निर्यातीला मोठी संधी मिळाल्याने ग्रामीण उत्पन्न वाढेल. भारताने दूध, धान्य आणि पोल्ट्री यांसारखी क्षेत्रे करारातून बाहेर ठेवून देशहित सुरक्षित ठेवले आहे.

Web Title : भारत-यूरोपीय व्यापार समझौता: 99% भारतीय उत्पादों को शून्य शुल्क प्रवेश।

Web Summary : भारत और यूरोपीय संघ ने एफटीए को अंतिम रूप दिया, जिससे 99% भारतीय उत्पादों को शून्य शुल्क प्रवेश मिलेगा। कपड़ा, ऑटो और आईटी जैसे प्रमुख क्षेत्रों को कम शुल्क और आसान बाजार पहुंच से लाभ होगा, जिससे निर्यात बढ़ेगा और रोजगार सृजित होंगे।

Web Title : India-EU trade deal: Zero duty access for 99% Indian products.

Web Summary : India and EU finalize FTA, granting 99% Indian products zero-duty access. Key sectors like textiles, auto, and IT will benefit from reduced tariffs and easier market entry, boosting exports and creating jobs.