जे मिसाइल बनवण्यात अमेरिकाही फेल झाली, तशी भारतानं 3-3 बनवली; पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 15:36 IST2024-12-15T15:34:49+5:302024-12-15T15:36:44+5:30

याचे संपूर्ण श्रेय जाते ते, भारतीय शास्त्रज्ञांच्या जिद्दीला आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) मेहनतीला.

india drdo project dhvani left america behind in hypersonic missile system Tensions between Pakistan and China will increase | जे मिसाइल बनवण्यात अमेरिकाही फेल झाली, तशी भारतानं 3-3 बनवली; पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढलं!

जे मिसाइल बनवण्यात अमेरिकाही फेल झाली, तशी भारतानं 3-3 बनवली; पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढलं!

जगातील महासत्ता म्हणवली जाणारी महाशक्तीशाली अमेरिकाही आज हायपरसोनिक मिसाइल तयार करण्यासाठी धडपडत आहे. मात्र कधीकाळी तांत्रिक क्षमतेत जगाच्या स्पर्धेत पिछाडीवर समजल्या जाणाऱ्या भारताने आज 3-3 महामिसाइल्स तयार करून संपूर्ण जगाला अचंबित केले आहे. आज तांत्रिक क्षमतेच्या  बाबतीत भारताची गणना जगातील अग्रणी देशांमध्ये होते. याचे संपूर्ण श्रेय जाते ते, भारतीय शास्त्रज्ञांच्या जिद्दीला आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) मेहनतीला. डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी प्रोजेक्ट ध्वनीअंतर्गत शक्तीशाली हायपरसोनिक शस्त्रे तयार केली आहेत. 

ध्वनीच्या वेगापेक्षा वेगवान असतात हायपरसोनिक मिसाइल -
खरे तर, हायपरसोनिक मिसाइल्स ही अशी मिसाइल्स असतात जी ध्वनीच्या वेगापेक्षा 5 पट वेगाने, म्हणजेच ताशी 6,200 किलोमीटर वेगाने उड्डाण करून आपल्या लक्ष्याला लक्ष्य करू शकतात. ही मिसाइल्स त्यांचा वेग आणि कमी उंचीवर उडण्याच्या त्यांच्या वैशिष्ट्यांमुळेही अत्यंत घातक बनतात, ज्यांना कुठलेही रडार पकडू शकत नाही. डीआरडीओचे हे हायपरसोनिक तंत्रज्ञान पूर्णपणे स्वदेशी आहे. महत्वाचे म्हणजे, हे हायपरसोनिक मिसाईल रॉकेट इंजिनद्वारेही लॉन्च होते आणि वातावरणात 6 ते 7 Mach वेगाने उडते. या शिवाय, ते 1,500 किलोमीटरपेक्षाही अधिकच्या रेंजमध्ये पेलोड वाहून नेण्यासही सक्षम आहे.

भारताच्या तिनही सेनांसाठी अत्यंत उपयोगी -
ध्वनीच्या वेगापेक्षाही 5 पट वेगाने उड्डाण करण्याची आणि कुठलेही रडार पकडू शकत नसल्याची खासियत असलेले हे हायपरसोनिक मिसाईल भारताच्या तिन्ही सैन्य दलासाठीसाठी (भूदल, नौदल आणि हवाई दल) उपयुक्त आहे. यामध्ये मिसाइलमध्ये स्क्रॅमजेट इंजिनचा वापर करण्यात आला आहे. जे उड्डाणावेळी मिसाइलचा वेग कायम ठेवते. भारताचे ब्रह्मोस-2 हे या हायपरसॉनिक तंत्रज्ञानाचे उत्तम उदाहरण आहे. सध्या DRDO तीन वेगवेगळ्या डिझाइन्सवर काम करत आहे.

पाकिस्तान चीनची खैर नाही - 
एकदा भारताकडून चुकून पाकिस्तानच्या दिशेने एक ब्रह्मोस मिसाइल डागले गेले होते. जे पाकिस्तान ट्रॅक करू शकला नव्हता. मात्र, आता ब्रह्मोस-2 आणि प्रोजेक्ट ध्वनीच्या हायपरसोनिक मिसाइल्ससमोर पाकिस्तानच काय पण चीन आणि अमेरिकन डिफेंस सिस्टिमही पूर्णपणे हतबल दिसत आहे. जेथे अमेरिकेला आपला हायपरसॉनिक कार्यक्रम आजवर यशस्वी करता आला नाही, तेथे भारताने रशियाच्या सोबतीने या तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवले आहे

Web Title: india drdo project dhvani left america behind in hypersonic missile system Tensions between Pakistan and China will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.