शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 08:09 IST

अमेरिकेत ५ नोव्हेंबरला झालेल्या निवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरूच, अमेरिकेत बहुतेक मतदान कागदी मतपत्रिका किंवा ई-मेल मतपत्रिकेद्वारे केले जाते. २०२४च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदानासाठी मशीन्सचा वापर फक्त ५% क्षेत्रात करण्यात आला.

न्यूयॉर्क - टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांनी भारताच्या निवडणूक पद्धतीचे कौतुक केले आहे. भारताने महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीसह अनेक राज्यांतील पोटनिवडणुका आणि लोकसभेच्या काही जागांचा निकाल जाहीर केला आहे. त्यावरून मस्क यांनी भारताच्या निवडणूक आयोगाचे कौतुक केले आहे.

भारतात एकाच दिवसात ६४ कोटी मतांची मोजणी (लोकसभा निवडणूक)  करण्यात आली तर कॅलिफोर्नियामध्ये निवडणुकीच्या १८ दिवसांनंतरही मते मोजली जात आहेत. यावर त्यांनी एका दिवसात भारताची ६४ कोटी मते कशी मोजली गेली, असा प्रश्नही मस्क यांनी उपस्थित केला आहे.

इलॉन मस्क यांचा ईव्हीएमवर आक्षेप

डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक इलॉन मस्क यांनी भारताच्या मतदान व्यवस्थेचे कौतुक करणे यामुळे महत्त्वाचे आहे की ते सातत्याने ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत आहेत. काही दिवसांपूर्वी मतदानात बॅलेट पेपरच्या वापरावर भर देताना त्यांनी संगणक प्रोग्रामवर अधिक विश्वास ठेवता येत नसल्याचा दावा केला होता. ते स्वत: संगणकतज्ज्ञ असल्याने ईव्हीएम हॅक करणे सोपे आहे हे त्यांना माहीत आहे. मतपत्रिका वापराव्यात आणि त्यांची हाताने मोजणी करावी, असे त्यांचे मत आहे.

येथे का लागतोय वेळ? अमेरिकेत बहुतेक मतदान कागदी मतपत्रिका किंवा ई-मेल मतपत्रिकेद्वारे केले जाते. २०२४च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदानासाठी मशीन्सचा वापर फक्त ५% क्षेत्रात करण्यात आला. त्यामुळे मोजणीला बराच वेळ लागतो आहे. कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील सर्वांत मोठे राज्य आहे. येथे ३.९ कोटी लोक राहतात. ५ नोव्हेंबर रोजी झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत १.६ कोटी लोकांनी मतदान केले होते. मतदानाला दोन आठवडे उलटले तरी अद्याप सुमारे तीन लाख मतांची मोजणी व्हायची आहे. अमेरिकेत दरवर्षी मतमोजणी व्हायला आठवडा लागतो.

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कEVM Machineईव्हीएम मशीनAmericaअमेरिकाElectionनिवडणूक 2024