पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात निष्पाप अफगाणी नागरिकांचा मृत्यू; भारताचा तीव्र शब्दात निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 16:24 IST2025-01-06T16:24:04+5:302025-01-06T16:24:38+5:30
India Condemn Pakistan: काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तीव्र संघर्ष पेटला आहे.

पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात निष्पाप अफगाणी नागरिकांचा मृत्यू; भारताचा तीव्र शब्दात निषेध
India Condemns Pakistan Airstrikes: गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तीव्र संघर्ष पेटला आहे. दोन्ही बाजूने सातत्याने एकमेकांवर हल्ले होत आहेत. अशातच, अफगाणिस्तानवरपाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्याचा भारताने तीव्र शब्दात निषेध केला आहे. आपल्या चुकांचे खापर शेजारील देशांवर फोडण्याची पाकिस्तानला जुनी सवय असल्याचे भारताने म्हटले आहे.
Our response to media queries regarding airstrikes on Afghan civilians:https://t.co/59QC0N6mOYpic.twitter.com/UsrkFGJVBZ
— Randhir Jaiswal (@MEAIndia) January 6, 2025
परराष्ट्र मंत्रालयाने आज (6 जानेवारी 2025) एक निवेदन जारी करून म्हटले की, "आम्ही अफगाण नागरिकांवर पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतोत. आपल्या अंतर्गत अपयशासाठी शेजाऱ्यांना दोष देणे ही पाकिस्तानची जुनी सवय आहे," असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
हल्ला कधी झाला?
डिसेंबर 2024 मध्ये तालिबानने दावा केला होता की, पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यात महिला आणि मुलांसह 46 लोक मारले गेले. अफगाण सरकारचे उप प्रवक्ते हमदुल्लाह फितरत यांनी सांगितले की, पक्तिका प्रांतातील बारमाल जिल्ह्यात चार ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. अफगाण संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात असा दावाही करण्यात आला आहे की, या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्यांपैकी बहुतांश वझिरीस्तानच्या निर्वासित शिबिरातील आहेत, ज्यात महिला आणि मुले आहेत.